अवैध बांधकाम प्रकरणी उस्मानाबाद पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांच्यावर गुन्हा दाखल

 
अवैध बांधकाम प्रकरणी उस्मानाबाद पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांच्यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील तांबरी विभागात ( घर क्रमांक १/६२९ ) अवैध बांधकाम केल्याप्रकरणी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 उस्मानाबाद नगरपरिषद हद्दीत तांबरी विभाग  ( घर क्रमांक १/६२९ ) येथे सुरेश ध्रुव तायडे यांनी नगरपरिषदेने दिलेल्या परवानगीचे उल्लंघन करुन बांधकाम केले होते. याप्रकरणी नगरपरिषदेने तायडे यांना नोटीस काढली असता त्यावर त्यांनी अवैध बांधकामही काढले नाही व नोटीसचे स्पष्टीकरणही दिले नाही. 

यावरुन नगरपरिषदेचे अधिकारी सुनील कांबळे  यांनी 02 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तायडे यांच्याविरुध्द महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायदा कलम- 53 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांनी तांबरी विभागात अवैध बांधकाम केल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी नगर पालिकेकडे केली होती. याच तक्रारीवरून तायडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

From around the web