उस्मानाबादेत कोवीड मनाई आदेशांचे उल्लंघन प्रकरणी एकास आर्थिक दंडाची शिक्षा

 
Osmanabad police

उस्मानाबाद   - शहरातील सुरेश शेषेराव कामठे, रा.उस्मानाबाद यांनी कोवीड मनाई आदेशांचे उल्लंघन करुन,  मास्क न वापरता गर्दी जमवुन आपल्या  दुकानात  व्यवसाय करुन  भादसं कलम 188, 269  चे  उल्लंघन केल्या बददल त्यांना  एक हजार रुपये दंड  व दंड न भरल्यास तीन दिवस साधा कारावासाची  शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी आज दिनांक 05 जुलै रोजी सुनावली आहे.

हाणामारीचे दोन गुन्हे 

 उमरगा :  पाणी फिल्टरचा धंदा का चालु देत नाही  तु  पाण्याचा  भाव  कमी केल्यांने धिरजचा पाणी  फिल्टरचा व्यवसाय चालत नाही. या कारणा वरुन  1) महेश चव्हाण,2) विष्णु चव्हाण, 3) अनंत चव्हाण सर्व रा.जगदाळवाडी  यांनी आकाश संजय भगत रा.जगदाळवाडी यांना  शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली व काठीने मारुन जखमी  केले व ठार मारण्याची धमकी दिली.  दिनांक 04 जुलै रोजी  आदर्श वाघमोडे यांनी दिले  प्रथम खबरे वरुन भादसं  324,323, 504,506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 ढोकी :  मंगल रमेश कांबळे, रा. पळसप यांना मागील  भांडणाची कुरापत काढुन तक्रारी  करुन 1) कुमार नागनाथ गायकवाड, 2) प्रमोद नवनाथ गायकवाड, दोघे रा.लातुर 3) चंद्रशेन सुधान कांबळे यांनी काठीने  मारहाण केली.मंगल यांना मारताना सोडवण्यास आलेले मुलगा-संजय, मुलगी- नेहा व प्रिया यांना पण काठीने मारहाण केली. मंगल कांबळे  यांनी दिले  प्रथम खबरे वरुन भादसं  324, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 पशु क्रुरता

भुम : भुम पो.ठा चे पथक दिनांक 03  जुलै रोजी 23.50 वा रात्र गस्त करत असतांना एम आय डी सी भुम येथे आयशर टेम्पो क्रमांक एच एम 13 सी यु 3006 जाताना दिसले. संशयावरुन पथकाने त्या वाहनाची झडती घेतली असता 1) खलील रफिक कुरेशी, 2) संतोष नारायण तरंगे दोघे रा.पापनस ता.माढा जि.सोलापुर,  हे त्या वाहनातुन अन्न पाण्याची व्यवस्था न करता विनापरवाना  व दाटीवाटीने अकरा जर्शी गाई, दोन बैल,  एक वासरु असे एकुण 14 गुरे वाहुन नेत असल्याचे आढळले. या वरुन भुम पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरे वरुन पशु क्रुरता अधिनियम कलम 11 व मपोका कलम 119 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web