उस्मानाबादेत एकाची फसवणूक, ७७ हजाराला गंडा 

 
उस्मानाबादेत एकाची फसवणूक, ७७ हजाराला गंडा

उस्मानाबाद -  अंकुश बळीराम मेटे, रा. बँक कॉलनी, उस्मानाबाद हे भुदलात दिल्ली येथे नायब सुभेदार हुद्यावर असुन ते सध्या उस्मानाबाद येथे आले आहेत. दि. 13.11.2020 रोजी त्यांच्या भ्रमणध्वनीवर एका अज्ञात भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधणाऱ्या पुरुषाने, “तुमच्या एसबीआय क्रेडीट कार्डची उधारी मर्यादा वाढवून देण्यासाठी त्या कार्डवरील क्रमांक सांगा.” असे सांगीतले. यावर अंकुश मेटे यांनी तशी माहिती समोरील व्यक्तीस सांगीतली असता मेटे यांच्या भ्रमणध्वनीवर एसबीआय अधिकोषामार्फत एक संदेश आला. मेटे यांनी हा संदेशातील मजकुर वाचून- समजून न घेता त्यातील ओटीपी समोरील व्यक्तीस सांगीतला असता मेटे यांच्या क्रेडीट कार्ड- बँक खात्यातून 77,685 ₹ अन्य खात्यावर स्थलांतरीत झाले. अशा मजकुराच्या अंकुश मेटे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

जुगार विरोधी कारवाई

 नळदुर्ग: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन नळदुर्ग पो.ठा. पथकाने नळदुर्ग येथे दि. 20.11.2020 रोजी 14.30 वा. सु. छापा टाकला. यावेळी 1)अविनाश बनसोडे 2)किरण कांबळे 3)धनराज वाघमारे 4)अमोल जाधव, सर्व रा. बौध्दनगर, तुळजापूर हे सर्वजण संगणक मटका जुगार खेळतांना जुगार साहित्य व 3,600 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन म.जु.का. कलम- 12 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

बेंबळी: राजु श्रीरंग तांबे, रा. टाकळी, ता. उस्मानाबाद हा दि. 20.11.2020 रोजी गावातील तलावाजवळ 180 मि.ली. देशी दारुच्या 20 बाटल्या (किं.अं. 1,200 ₹) विनापरवाना बाळगला असतांना पो.ठा. बेंबळी च्या पथकास आढळला.

 
 उमरगा: तानाजी व्यंकट कोळी, रा. मुळज, ता. उमरगा हा दि. 20.11.2020 रोजी मुळज शिवारात 20 लि. गावठी दारु (किं.अं. 1,300/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना पो.ठा. उमरगा च्या पथकास आढळला.यावरुन पोलीसांनी नमूद अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web