महापुरुषांच्या जयंत्या व उत्सवानिर्मित्त वाहतूक नियमनाबाबत सूचना जारी

 
महापुरुषांच्या जयंत्या व उत्सवानिर्मित्त वाहतूक नियमनाबाबत सूचना जारी

 उस्मानाबाद -जिल्हयात येत्या दि.11 एप्रिल 2021 रोजी महात्मा फुले यांची जयंती.दि.13 एप्रिल-2021 रोजी गुढी पाडवा.दि.14 एप्रिल 2021 ते दि.30 एप्रिल 2021 या कालावधीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.,दि.21 एप्रिल-2021 रोजी श्रीराम नवमी.दि.23 एप्रिल-2021 ते दि.27 एप्रिल-2021 या कालावधीत श्री.तुळजाभवानी चैत्री पौर्णिमा.दि.25 एप्रिल-2021 रोजी महावीर यांची जयंती.दि.27 एप्रिल-2021 रोजी हनुमान जयंती.आणि दि.28 एप्रिल-2021 ते दि.01 मे-2021 या कालावधीत श्री येडेश्वरी देवी चैत्री पोर्णिमा हे सण,उत्सव आहेत.यानिमित जिल्हयातील वाहतुकीचे नियंत्रण आणि नियमन करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी दिले आहेत.

      जिल्हयात सण,उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी वाहतुकीचे नियंत्रण आणि नियमन करणे आवश्यक आहे.कोणताही अनुचित प्रकार न घडता कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी,जर तणावाची परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीवर तात्काळ मात करता यावी म्हणून पोलीस अधीक्षक श्री.रौशन यांनी  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 प्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकाऱ्यांना दि.10 एप्रिल-2021 रोजीचे 00.01 वा.पासून ते दि.01 मे-2021 रोजीचे 24.00 वा.पर्यंत काही अधिकार प्रदान केले आहेत.

      रोडवरील किंवा रोडवर जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांची वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे.अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गाने जाव्यात किंवा कोणत्या मार्गानी जावू नयेत, ते मार्ग विहीत करणे  सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व प्रतिमा पुजनाच्या सर्व जागांच्या आसपास प्रतिमा पुजनांच्या वेळी व कोणत्याही सडकेवरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी, गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होणण्याची शक्यता असेल,अशा सर्व ठिकाणी अडथळा होवू न देणे.सर्व रस्त्यांवरील,नद्यांचे घाटांवर सार्वजनिक ठिकाणी,स्नानाचे,कपडे धुण्याचे ठिकाणी जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यात सडके जवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागे जवळ वाद्य वाजविणे आणि शिंगे, कर्कश वाद्य वाजविणे यावर नियमन करणे, अगर त्यावर नियंत्रण ठेवणे.सक्षम अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम 33,34,37 ते 41 या कलमान्वये केलेल्या कोणत्याही नियमनात्मक आदेशांचे अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.जोकोणी वरील नियमनात्मक आदेशांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन  केल्यास महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चेकल 134 प्रमाणे शिक्षेस पात्र राहिल.असेही या आदेशात पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी म्हटले आहे.

From around the web