बांधकामासाठी माहेराहून पैसे आणले नाहीत म्हणून उस्मानाबादेत विवाहितेचा खून
उस्मानाबाद - श्रीमती- ज्योती रमाकांत खटके, वय 35 वर्षे, रा. उस्मानाबाद यांनी बांधकामासाठी माहेरहुन पैसे आणावेत यासाठी सासरकडील 1) रमाकांत धनाजी खटके (पती) 2) धनाजी खटके (सासरा) 3) सुवर्णा खटके (सासु) 4) प्रकाश खटके (दिर) 5) महेश खटके (दिर) सर्व रा. उस्मानाबाद यांनी दि. 11.08.2021 रोजी 19.00 वा. सु. राहत्या घराच्या पहिल्या मजल्याच्या बालकनीमधुन ज्योती यांना ढकलुन दिल्याने त्या खाली पडून मयत झाल्या. अशा मजकुराच्या सिध्देश्वर निवृत्ती गोफणे, रा. सोलापूर यांनी दि. 12 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 498 (अ), 302, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
हाणामारीच्या दोन घटना
उस्मानाबाद : आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन खानापूर, ता. उस्मानाबाद येथील रंगनाथ व लक्ष्मण रंगनाथ डबडे या दोघा पिता- पुत्रांनी दि. 12 ऑगस्ट रोजी 08.15 वा. सु. ग्रामस्थ- शिवाजी चंद्रकांत करंडे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगड फेकून मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या शिवाजी करंडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : “तु सुपारी व माळवे आम्हाला उधार का देत नाही?” या कारणावरुन उपळा (मा.), ता. उस्मानाबाद येथील अमर पडवळ व गणेश यादव या दोघांनी दि. 10 ऑगस्ट रोजी 00.30 वा. सु. हणमंत उध्दव पडवळ यांना त्यांच्या राहत्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या हणमंत पडवळ यांनी दि. 12 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.