भाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे -  आ.रोहित पवार

 
भाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे -  आ.रोहित पवार

उस्मानाबाद - युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. उद्धवराव पाटील यांचे सामाजिक काम मोठे आहे. शेतकरी, कष्टकरी हेच जीवनाचे तत्व आयुष्यभर जपले. त्यासाठी भाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे, असे आमदार रोहित पवार यांनी येथे बोलताना सांगितले.

भाई उद्धवराव पाटील यांच्या १०१ व्या जयंती निमित्त आयोजित कोवीड योध्यांचा सन्मान व व्याख्यान प्रसंगी आमदार रोहित पवार बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर हे होते. प्रसंगी आमदार संजय शिंदे , संयोजक आदित्य पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

 बदलत्या राजकारणातील युवकां समोरील संधी व आव्हाने या विषयावर आमदार रोहित पवार बोलत होते. गेली शंभर दिवस देशात कृषी कायद्या विरोधात असणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दडपला जातो आहे. सरकार सर्व सामान्य लोकांच्या हितासाठी न लढता, ठराविक लोकांच्या हितासाठी लठणाऱ्यांचा युवकांनी विरोध केला पाहिजे. देशहिता विरुद्ध काम करणाऱ्या अर्णव गोस्वामीच्या विषयावर युवकांनी चर्चा घडवून आणावी. युवकांनी नेहमी सामाजिक विषयांवर, देश हितावर चर्चा घडवून आणायला हवी. भाई उद्धवराव पाटील यांच्या विचारांच्या लढाईने युवकांनी राजकारणातून समाजकारण करावे असे पुढे बोलताना आमदार रोहित पवार यांनी सांगितले.तर काळाने उभी केलेले पेच सोडवण्याचा प्रयत्न भाई उद्धवराव पाटील यांच्या जीवन चरित्रातून आपल्याला पहायला मिळतो. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी बोलताना सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात भाई उद्धवराव पाटील विचार मंच, उस्मानाबाद यांनी केले होते. प्रास्ताविक भाई उद्धवराव पाटील विचार मंचचे सचिव आदित्य पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रवी सुरवसे व अमोल दीक्षित यांनी केले. तर आभार उपमुख्याध्यापक पी. एन. पाटील यांनी मानले.

 या कोरोना योध्यांचा झाला सन्मान

१ ) कस्तुरचंद चौगुले २ ) बालाजी चौगुले ३ ) चंद्रकांत दवणे ४ ) अजिंक्य जानराव ५ ) दिगंबर डुकरे ६ )जलील शेख ७ ) ८ ) जमील शेख ९ ) एस बी कांबळे १० )  विलास गोरे११ ) १२ ) गाजीमिया शेख १३) आदित्य जानराव १४) बाळासाहेब गोरे आदी सफाई मजूर, फवारणी मजूर व स्वच्छता दूत यांचा यावेळी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल देऊन सन्मान करण्यात आला.

 महाविद्यालयासाठी उद्धवराव पाटील यांचे नाव द्यावे

उस्मानाबाद जिल्ह्याला नवीन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून या महाविद्यालयासाठी उद्धवराव पाटील यांचे नाव द्यावे असे निवेदन यावेळी आमदार रोहित पवार यांना देण्यात आले.

Video

From around the web