सोशल मिडीयाचा दुरुपयोग, उस्मानाबादेत गुन्हा दाखल 

 
सोशल मिडीयाचा दुरुपयोग, उस्मानाबादेत गुन्हा दाखल

उस्मानाबाद -  सामाजिक माध्यमांवर पोलीसांची नियमीत नजर असते. अशाच एका प्रकरणात सायबर पोलीस ठाणे, उस्मानाबाद यांच्या निदर्शनास आले की, उस्मानाबाद शहरातील बॅक कॉलनीत राहणारा प्रविण सुर्यवंशी याने दि. 11.06.2020 रोजी 02.41 वा. सु. वेळोवेळी फेसबुक या सामाजिक माध्यमाद्वारे बालकांची अश्लील छायाचित्रे- चित्रफिती प्रसारीत करुन माहिती तंत्रज्ञान कायदा कलम – 67 (ब) चे उल्लंघन केले. यावरुन सायबर पोलीस ठाणे, उस्मानाबाद च्या पोलीस निरीक्षक श्रीमती- अर्चना पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 
अपहरण

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका 16 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) गावातीलच- दोन व्यक्तींनी स्वत:च्या मुलासोबत लग्न लावण्याचे अमिष दाखवून दि. 02.05.2021 रोजी 18.30 वा. सु. तीच्या राहत्या घरातून तीचे अपहरण केले. अपहृत मुलीच्या माता- पित्यांनी तीचा शोध घेतला असता तीला शेजारील गावच्या एका व्यक्तीच्या घरी नेउन ठेवले असल्याचे त्यांना समजले. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने 03 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 366, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web