उस्मानाबादेत विवाहित महिलेचा विनयभंग 

जाब विचारणाऱ्या पतीस आरोपीकडून मारहाण 
 
 
उस्मानाबादेत विवाहित महिलेचा विनयभंग

उस्मानाबाद -  एक 25 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 04.01.2021 रोजी 21.00 वा. सु. आपल्या घरी एकटी असतांना शेजारच्या गल्लीतील एका तरुणाने तिच्या  घरात घुसून तीला, “तु मला खुप आवडतेस मला फोन करत जा.” असे लज्जास्पद बोलून व तिच्याशी झोंबाझोंबी करुन तीचा विनयभंग केला. 

ही हकीकत त्या महीलेने पतीस सांगीतल्याने पतीने त्याचा जाब त्या तरुणास विचारला असता त्या तरुणासह त्यांच्या कुटूंबीयांनी त्या महिलेसह तीच्या पतीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 354 (अ), 323, 504, 452, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण

उस्मानाबाद - जिल्ह्यातील एका गावातील एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 04.014.2021 रोजी 08.00 वा. खाजगी शिकवणीस गेली होती. ती घरी न परतल्याने कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावरुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलाने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web