उस्मानाबादेत अल्पवयीन मुलीचे अपहरण
उस्मानाबाद : एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) 07 फेब्रुवारी रोजी गावातील दुकानाकडे गेली असता ती घरी लवकर न परतल्याने कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता तीच्याबद्दल काही उपयुक्त माहिती मिळली नाही. यावरुन तीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलाने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
विनयभंग
उस्मानाबाद : एका गावातील तरुणाने गावातीलच एक 24 वर्षीय महिला 07 फेब्रुवारी रोजी 15.15 वा. सु. घरी एकटी असल्याची संधी साधून तीच्या घरात घुसून तीस लज्जा वाटेल असे कृत्य करुन तीच्या सोबत झोंबाझोंबी केली. तसेच घडला प्रकाराची वाच्यता केल्यास त्या महिलेच्या मुलास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत तरुणाविरुध्द भा.दं.सं. कलम- 354, 354 (अ), 506, 452 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
ढोकी: वाणेवाडी, ता. उस्मानाबाद येथील गणेश काशिनाथ घेवारे हे 08 फेब्रुवारी रोजी 18.00 वा. सु. वानेवाडी गट क्र. 93 मधील शेताची मशागत करत होते. यावेळी शेत मशागत केल्याच्या कारणावरुन भाऊबंद- नितीन विश्वनाथ घेवारे, विश्वनाथ घेवारे, निर्मला घेवारे या तीघांनी गणेश घेवारे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गणेश घेवारे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.