जिजाऊ जन्मोत्सवातील आनंद मेळावा उत्साहात साजरा
उस्मानाबाद : जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्यावतीने श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आज आनंद मेळावा उत्साहात पार पडला. आनंद मेळाव्याचे उद्घाटन समितीच्या अध्यक्षा नगरसेविका सौ.प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य प्रा.साहेबराव देशमुख, डाॅ.मंजूळा पाटील, उपप्राचार्य प्रा.संतोष घार्गे, पर्यवेक्षक प्रा.तानाजी हाजगुडे, प्रा.नंदकुमार नन्नवरे, प्रा.सुर्यकांत कापसे, सौ.भारती गुंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या उद्घाटनपर भाषणात सौ.प्रेमाताई पाटील यांनी मुलांच्या विविध गुणांचे अवलोकन करण्याच्या हेतूने आनंद मेळाव्याचे आयोजन मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने केले आहे. मुला-मुलींना व्यावहारिक ज्ञान व्हावे, त्यांचे व्यावसायिक कौशल्यांचा विकास होऊन व्यक्तिमत्व विकासात भर पडावी. हा आनंद मेळावा आयोजनामागे समितीचा उद्देश आहे, असे प्रतिपादन केले.
आनंद मेळाव्यात मुलामुलींनी स्वत: बनवलेल्या विविध चवीष्ट खाद्य पदार्थांचे स्टाॅल लावले होते. खाद्य पदार्थांच्या विक्रिमधून मुलांनी मोठी आर्थिक कमाई केली. आनंद मेळाव्यात वेगवेगळ्या पदार्थांचे 85 ते 90 स्टाॅल उभारण्यात आले होते. मुलांनी विविध खाद्यपदार्थांची विक्री करुन व्यवहाराज्ञान घेतले. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी व्यावसायीक कौशल्य वाढीस चालना मिळाली. मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या सदस्यांनी मुलांच्या व्यवहार चातुर्याचे कौतुक केले.
विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, समिती सदस्यांनी खाद्यपदार्थांचा मनमुराद आनंद लुटला. या आनंद मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रा.प्रीती मेटे, प्रा.अनिता तुंगीकर, प्रा.सरोज साळुंके, प्रा.प्रगती वाघमारे, प्रा.दिपाली बंडगर, प्रा.लक्ष्मी भोसले, प्रा.शुभांगी माने, प्रा.शिवकन्या सुरवसे, प्रा.सुप्रिया मिरगणे, प्रा.कविता वडगणे, प्रा.ज्योती शिंदे आदींनी अथक परिश्रम घेतले.