उस्मानाबाद जिल्हयातील महिलांनी पंतप्रधान मातृ वंदना योजनेचा लाभ घ्यावा

 


 उस्मानाबाद जिल्हयातील महिलांनी पंतप्रधान मातृ वंदना योजनेचा लाभ घ्यावा



           उस्मानाबाद - जिल्हयात  केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना माहे-जानेवारी 2017 पासून राबविण्यात येत असून या योजने अंतर्गत पहिल्यांदा गरोदर असलेल्या मातेस पहिल्या जिवंत अपत्या पर्यंत सर्व स्तरातील रु.5000/- चा लाभ तिन टप्प्या मध्ये संगणक प्रणाली व्दारे लाभार्थीच्या आधार संलग्न खात्यावर जमा केला जातो. त्यानुसार आज पर्यंत ग्रामीण व शहरी भागात 28501 लाभार्थीला रु.11 कोटी 51 लाख लाभार्थीना लाभ देण्यात आलेला आहे.


       उस्मानाबाद जिल्हयात कोविड-19 या कालावधी मध्ये 3461  गरोदर मातांना 1 कोटी 64 लाख 30 हजार लाभ देण्यात आलेला असुन सदर लाभा मध्ये मातेच्या सकस अहार अंशःत बुडीत मजुरी साठी हा लाभ देण्यात येतो. लाभार्थी मातेस लाभ घेण्यासाठी मातेचे आधार कार्ड, पतीचे आधार कार्ड, गरोदर मातेचे आधार सलग्न बैंक/पोस्ट खाते व माता बाल संगोपन कार्ड झेरॉक्स प्रत, बाळाचे जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.


         या योजनाची अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य संस्था/ए.एन.एम./आशा स्वयंसेविका/अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा व या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी  लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.जी.नवाळे यांनी केले आहे.


  या बैठकीस  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, बाहय संपर्क विभागाचे वैदयकीय अधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. सोपल सहा. संचालक  कुष्ठरोग , डॉ.रफिक अंसारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एम. आर. पांचाळ व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. किरण गरड  बैठकीस उपस्थित होते.

From around the web