उस्मानाबादेत सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे तिहेरी तलाक देणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

 
उस्मानाबादेत सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे तिहेरी तलाक देणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

उस्मानाबाद - ऑटोरिक्षा खरेदीसाठी माहेराहुन 3,00,000₹ आणण्यासाठी एका विवाहीतेचा सासरकडील लोक सन- 2015 पासुन शारिरीक- मानसिक छळ करत होते. तरिही सुनेने माहेराहुन पैसे न आनल्याने त्यांनी तीला घराबाहेर हाकलून दिल्याने ती महिला माहेरी जाउन राहु लागली. 24 फेब्रुवारी रोजी त्या महिलेच्या पतीने उस्मानाबाद येथील एका दैनिक वृत्तपत्रात जाहिर प्रकटन करुन तसेच स्वत:च्या व्हाट्सॲप स्टेटसवर तीहेरी तलाक दिल्याचा मजकुर प्रसिध्द केला. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन पती, सासु, दिर- जाऊ अशा चौघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 498 (अ), 323, 504, 34 आणि मुस्लीम महिलांच्या विवाह हक्कांचे संरक्षण कायदा कलम- 4 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

महिलेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरकडील लोकांवर गुन्हा दाखल

 भुम: पती- करण पंचाहत्तर काळे यास घटस्फोट द्यावा या उद्देशाने पतीसह सख्खी व सावत्र सासु, सासरा, दिर, नणंद अशा 6 व्यक्तींनी श्रीमती राणी करण काळे, वय 23 वर्षे यांचा वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. त्यांच्या या छळास कंटाळून  राणी हिने 25 फेब्रुवारी रोजी पाथ्रुड ता. भुम येथे येथे सासरी विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या नातेवाईक- खुपदान गंगाराम भोसले, रा. बारामती, जि. पुणे यांनी 26 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरु भा.दं.सं. कलम- 498 (अ), 306, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण

 मुरुम: मारुती खराते, रा. आलुर, ता. उमरगा हे 20 फेब्रुवारी रोजी 23.00 वा. सु. घरासमोर होते. यावेळी गावकरी- रेखा खराते, रोहिदास कांबळे यांसह महादेवी व शेषेराव शेवाळकर या पती- पत्नींनी व अन्य 5-6 अनोळखी लोकांनी जुन्या वादातून मारुती खरात यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लाकडी काठीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत मारुती यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले. अशा मजकुराच्या मारुती खराते यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 323, 324, 325, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web