उस्मानाबादेत किरकोळ करणावरून एकास बेदम मारहाण 

 
उस्मानाबादेत किरकोळ करणावरून एकास बेदम मारहाण

उस्मानाबाद -  रविंद्र हरीदास कदम, रा. समर्थ नगर, उस्मानाबाद हे दि. 10.01.2021 रोजी 22.00 वा. आपल्या घरी असतांना गल्लीत मोठ्या आवाजात संगीत यंत्रना चालू होती. अखेर वैतागून रविंद्र यांनी तेथे जाउन त्या यंत्रनेचे बटन बंद केले. यावेळी तेथे उपस्थित असलेले गल्लीतील युवक- वैभव व संकेत भागवत काकडे या दोघा बंधुंसह अन्य दोन अनोळखी तरुणांनी बटन बंद केल्याच्या रागातून रविंद्र कदम यांना, “थांब तुला आता खल्लासच करतो.” असे धमकावून शिवीगाळ करुन ठार मारण्याच्या उद्देशाने दगड फेकून मारहाण केली. यात दगड रविंद्र यांच्या हातावर लागल्याने जखम झाली. अशा मजकुराच्या रविंद्र कदम यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

 नळदुर्ग: चालक- ज्ञानोबा परिहार, रा. औसा यांनी बस क्र. एम.एच. 25 बीएल 1237 ही दि. 11.01.2021 रोजी 10.00 वा. राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर नळदुर्ग शिवारात चालवून समोरील ऑटोरिक्षाला पाठीमागून धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक- सिध्दाप्पा सुभाष क्षिरसागर, वय 29 वर्षे, रा. आंदूर, ता. तुळजापूर हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या त्यांचे वडील- सुभाष क्षिरसागर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web