महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तात्त्काळ 'शक्ती' कायदा करा - भाजयुमो
उस्मानाबाद - उस्मानाबादसह राज्यात महिला, तरुणी आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार वाढले असून, हे अत्याचार रोखण्यासाठी लवकरात लवकर शक्ती कायद्या करावा, अशी मागणी भाजयुमोच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात अली आहे.
महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली, तरुणी आणि महिलावर अनेक ठिकाणी अत्याचार झाले. लाॅकडाउनच्या काळामध्ये हाॅस्पीटलमध्ये सुध्दा महिलांवर अत्याचार झाले. पेन, रायगड येथील बलात्काराच्या आरोपाखाली तुरूगांत शिक्षा भोगत असलेल्या आणि पॅरोलवर सुटका झालेल्या आरोपीने 3 वर्षीय आदिवासी मुलीवर अत्याचार करून तीची हत्या केली. उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर औरंगाबाद येथे ही नोकरीचे आमिश दाखवून एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली. पण त्या संशयितांची अजून कुठल्याही प्रकारची चौकशी केली गेली नाही.
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या निलमताई गोऱ्हे यांनी एक प्रसिध्दी पत्रक काढले व त्यामध्ये त्यांनी उध्दव ठाकरे सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा नामोल्लेख केला. तरी देखील हे ठाकरे सरकार व गृह मंत्र्याने आत्तापर्यंत झालेल्या दुर्दैवी घटना यावरती कुठल्याही प्रकारचे ठोस पावले उचलली नाहीत. याच सरकारने गाजावाजा करत महिलांवरील आत्याचार रोखण्यासाठी ‘शक्ती ’ हा कायदा पुढे आणला. पण याची अंमलबजावणी करण्यास हे ठाकरे सरकार कुचकामी ठरत आहे. त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांना स्वतच्या पक्षा विरूध्द तसेच सरकार विरूध्द प्रसिध्दी पत्र काढण्याची वेळ आली. स्वतः निलम गोरे या नेहमी महिलांचा अत्यंत कळवळा घेवून काम करतात. पण त्या सुध्दा हतबल झालेल्या दिसत आहेत.
भारतीय जनता मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्या सुचनेनुसार व आ.राणाजगजितंिसंह पाटील यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आवाहन करतो की, या ‘शक्ती’ कायद्यास लवकर मुर्त स्वरूप देवून ज्या काही महिलांवरील व युवतीवरील अत्याचाराच्या घटना राज्यात घडलेल्या आहेत. जे गुन्हेगार आहेत व ज्यांचा या गुन्हयात सहभाग आहे, अशा सर्व गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा सरकारला भारतीय जनता युवा मोर्चाच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, गजानन नलावडे, विनोद निंबाळकर, अमोल राजेनिंबाळकर, सुजित साळुंके, प्रितम मुंडे, सचिन लोढे, सुनिल पंगुडवाले, राहुल शिंदे, सुरज शेरकर, गणेष इंगळगी, शरीफ शेख, भगवंत गुंड, शकर मोरे, पुजा राठोड, मिताली राउत, प्रसाद मुंडे, अक्षय किशोर विंचुरे, शेख नसरोददीन मैनोददीन यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .