उस्मानाबादेत पत्नीचा छळ करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल
Nov 19, 2020, 19:19 IST
उस्मानाबाद - शिमरन गुलाम अली, शिवरत्न चौक, उस्मानाबाद यांचे पती- गुलाम हैदर अली यांनी पत्नी- शिमरन अली यांचा किरकोळ कारणावरुन सन 2019 पासुन खाजानगर, उस्मानाबाद येथे वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. तसेच नांदवणार नसल्याचे धमकावून ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शिमरन अली यांनी काल दि. 18.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पती- गुलाम अली याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 498 (अ), 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण
तुळजापूर: एका 17 वर्षीय मुलीचे (नाव- गाव गोपनीय) दि. 11.11.2020 रोजी 20.30 वा. सु. राहत्या गल्लीतून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आईच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.