उस्मानाबादेत भाजप कार्यकर्त्यांकडून वीज बिलाची होळी
उस्मानाबाद - लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील महाराष्ट्र विद्युत महावितरणाच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले.
ठाकरे सरकारने लॉक डाऊन काळातील वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्या नंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले की,100 यूनिट पर्यंतचे वीज बिल माफ करू. पण या आघाडी सरकारने कोणतेच आश्वासन पूर्ण केले नाही. कोरोंना मुळे लॉकडाऊन केल्यानंतर सर्व सामान्य जनता, व्यापारी, उद्योधंदे ठप्प होऊन मोठ्या प्रमाणात सर्वांचे आर्थिक नुकसान झाले. येवढे मोठे संकट येऊन सुद्धा राज्य शासनाने कोणतीही सहानभूती दाखवली नाही. या मुळे भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने ठाकरे सरकारच्या विरोधात तीव्र नोंदवण्यात आला. जर सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन वीज बिल माफ केले नाही तर भारतीय जनता पार्टी परत एकदा सामान्याच्या हक्कासाठी मैदानात उतरेल याची नोंद घ्यावी, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा लातूर शहर जिल्हा प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी, प्र.का.सदस्य सुधीर आण्णा पाटील, प्र.का.सदस्य ॲड. खंडेराव चौरे, जिल्हा संघटन सरचिटणीस ॲड..नितीन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष .इंद्रजित देवकते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष . राहुल काकडे,.बालाजी कोरे, नगरसेवक योगेश जाधव, नगरसेवक दाजीआप्पा पवार, विनायक कुलकर्णी,.गिरीश पानसरे, विनोद निंबाळकर, प्रवीण पाठक, .सुनील पंगुडवाले, रमन जाधव, अमोल राजेनिंबाळकर, विनायक कुलकर्णी, संदीप इंगळे, सूरज शेरकर, बंटी मुंडे, ओम नाईकवाडी, अशोक पेठे, स्वप्नील नाईकवाडी, गणेश इंगळगी, राज निकम, हिम्मत भोसले, गणेश मोरे, विशाल पाटील, अतिक शेख, शरीफ शेख, .श्रीराम मुंबरे, प्रवीण सिरसट, अक्षय भालेराव, सुशांत लोकरे, आबा देशमुख, आतिक पटेल, नरेन वाघमारे, मेसा जानराव, तसेच शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.