उस्मानाबादेत गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस 

गालिबनगरमध्ये अनेक घरांत पाणी शिरले  Video 
 
s
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक दलाचे जवान, शिवसैनिक साळुंके यांनी केली सहा लोकांची सुटका 

उस्मानाबाद - शहरात गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गालिबनगरमधील अनेक घरांत पाणी शिरले होते. त्यात एका घरात पाच ते सहा लोक अडकले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी धावून त्यांची सुटका केली. 

उस्मानाबादेत  पवन राजे कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे वक्फ बोर्डाची जागा आहे. याच भागातून एक मोठा नाला वाहतो. या नाल्याजवळ ५० ते ६० गोरगरीब लोकांनी पत्र्याचे शेड्स मारून आपला संसार थाटला आहे. निवडणुकीच्या दरम्यान, सर्वच राजकीय पुढारी त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन  देतात,पण त्यांचा प्रश्न गेली अनेक वर्षे सुटलेला नाही. 

s

पावसाळयात दरवर्षी या घरात पाणी शिरते आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनआणि अग्निशामक दलाच्या जवानाची मदत घ्यावी लागते. गुरुवारी शहरात मुसळधार पाऊस सुरु होताच, अनेक घरात पाणी शिरले. एका घरात पाच ते सहा लोक अडकले होते. यावेळी एका रहिवाशाने शिवसैनिक प्रशांत बापू साळुंके यांना फोन करून आपली कैफियत सांगितली. 

साळुंके यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक दलाशी संपर्क साधून काही जवानांसह घटनास्थळी धाव घेतली, अपघातामुळे पायाला जखम झाली असताना साळुंके यांनी मदत कार्यात मदत केली. 

उस्मानाबाद नगर पालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. दर निवडणुकीत पोकळ आश्वसने देणारे नगरसेवक यंदा मात्र कोणत्या तोंडाने या भागातील लोकांची मते मागणार ? असा सवाल आहे. या भागातील नाल्यावर एका राजकीय पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षाने अतिक्रमण करून घर बांधल्याने नाला तुंबून अनेकांच्या घरात  असल्याचा आरोप स्थानिक रहिवाश्यांनी केला आहे. 

From around the web