मध्यवर्ती जयंती समारोह समितीच्या वतीने महामानवास अभिवादन

मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांना मिठाईचे वाटप
 
मध्यवर्ती जयंती समारोह समितीच्या वतीने महामानवास अभिवादन

उस्मानाबाद- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समारोह समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार कैलास पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांच्यासह समितीचे विद्यानंद बनसोडे, मोहन बनसोडे, प्रवीण बनसोडे, रोहित लगाडे, किशोर बनसोडे, अमित सोनवणे, बाबासाहेब बनसोडे व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात मध्यवर्ती जयंती समारोह समितीच्या वतीने नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी भीमनगर व  परिसरातील उपासक व उपसिका मोठ्या संख्येने प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वभूषण बनसोडे, बुधभूषण बनसोडे, राकेश गायकवाड, प्रेम ओव्हाळ, शरद कांबळे, सुशीलकुमार बनसोडे, बाळू जानराव, शरद वाघमारे, अभिषेक पांडागळे, आनंद बनसोडे, आदित्य बनसोडे यांनी परिश्रम घेतले.

From around the web