उस्मानाबादेत शेतकऱ्याकडून 55 हजार रुपयाची लाच घेताना महावितरणच्या अभियंत्यासह चौघे चतुर्भुज 

 
उस्मानाबादेत शेतकऱ्याकडून 55 हजार रुपयाची लाच घेताना महावितरणच्या अभियंत्यासह चौघे चतुर्भुज

उस्मानाबाद - विद्युत डीपीच्या उभारणीसाठी शेतकऱ्याकडून ५५ हजारांची लाच घेताना महावितरणचे अभियंता, ठेकेदार, लाईनमन आणि एका खासगी इसम अश्या चौघाना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे.

 बाह्यस्रोत यंत्रचालक महावितरण उपकेंद्र शहापूर यांनी सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय नळदुर्ग ग्रामीण यांच्यासाठी 15000 रुपये लाचेची मागणी केल्याने व सहाय्यक अभियंता  यांनी बाह्यस्रोत यंत्रचालक यांच्या मार्फतीने 5000 रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष  स्वीकारण्याचे मान्य केल्याने तसेच महावितरणचे शासकीय गुत्तेदार यांनी 55000 रुपये लाचेची मागणी करून 55000 रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने व  लाईनमन यांनी प्रोत्साहन दिल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. 

तक्रारदार  यांचे  व  इतर शेतकरी यांचे शेतात विदयुत पुरवठा होणारे   महावितरचा डीपी जळल्याने  तक्रारदार यांनी व  इतर शेतकरी यांनी श्रीकांत हिम्मत साळुंके, वरिष्ठ तंत्रज्ञ (लाईनमन ), शहापूर यांचेकडे तोंडी  तक्रार केली होती परंतु  डीपी दुरुस्त न झाल्याने,  तसेच 63 किलो vat  चे डीपी चे जागी 100 किलो vat  डीपी लावनेची प्रक्रिया करण्यासाठी दिनांक 20.01.2021 रोजी महावितरण कार्यालय नळदुर्ग ग्रामीण येथे इंद्रजित बाबुराव शिंदे,बाह्यस्रोत यंत्रचालक महावितरण उपकेंद्र शहापूर यांनी हनुमंत अशोक सरडे, सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय नळदुर्ग ग्रामीण यांच्यासाठी तक्रारदार यांच्याकडे  पंचांसमक्ष  15000 रुपये लाचेची मागणी केली व हनुमंत अशोक सरडे, सहाय्यक अभियंता  यांनी बाह्यस्रोत यंत्रचालक शिंदे  यांच्या मार्फतीने 5000 रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष  स्वीकारण्याचे मान्य केले. 

तसेच   दि. 21.01.2021   रोजी आयुष ट्रान्सफॉर्मर   इंजेनेरिंग वर्क, midc  उस्मानाबाद  येथे तक्रारदार आणि  इतर शेतकरी यांना विदयुत पुरवठा करणारे 63 किलो vat  डीपी बदलून 100 किलो vat चा डीपी देण्यासाठी  महावितरणचे शासकीय गुत्तेदार अमीत दशरथ उंबरे  यांनी 55000 रुपये लाचेची मागणी करून 55000 रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारली   व श्रीकांत हिम्मत साळुंके, वरिष्ठ तंत्रज्ञ (लाईनमन ), शहापूर  यांनी प्रोत्साहन दिल्याने  पो स्टे आनंदनगर , उस्मानाबाद येथे गुन्हानोंदवण्यात आला आहे. 

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. उस्मानाबाद, बाळकृष्ण हनपुडेपाटील, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी.बीड   यांचे  मार्गदर्शनाखाली  गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षण, ला. प्र. वी. अशोक हुलगे , पोलीस निरीक्षक, ला. प्र. वी. उस्मानाबाद यांनी केली.याकामी त्यांना पोलीस अंमलदार इपतेकर शेख, दिनकर उगलमूगले, पांडुरंग  डमरे, मधुकर जाधव ,विष्णू बेळे, विशाल डोके, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य    व  चालक करडे यांनी मदत केली. 

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( कार्यालय क्र. ०२४७२- २२२८७९, मो.नं.९५२७९४३१००) गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वी. उस्मानाबाद (मो. क्र. 8888813720) अशोक हुलगे , पोलीस निरीक्षक, ला. प्र. वी. उस्मानाबाद (मो. क्र.8652433397 ) यांनी केले आहे.

From around the web