उस्मानाबादेतील प्रभागाच्या विकासासाठी शिवसेनेच्याच नगरसेवकांची पालकमंत्र्यांकडे साकडे
उस्मानाबाद - प्रभागाच्या विकास कामांसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देण्यात यावा असे मागणीवजा साकडे सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांनी एका निवेदनाद्वारे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे घातले आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मागील झालेला दोन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हे दोघे ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात. त्या प्रभागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन न दिल्यामुळे तो प्रभाग विकास कामापासून वंचित ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे पांढरी स्मशानभूमी नूतनीकरण करणे, विजय चौक ते तुपे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली करणे, कुंभार गल्ली, नाना मैराण यांचे घर ते वाघमोडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे, राम मंदिर ते लोहार मज्जित सिमेंट काँक्रीट व नाली करणे, संपत डोके यांच्या घरापासून ते ननवरे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली करणे, खरोसेकर यांच्या घरापासून ते भोसरेकर यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली करणे, तर देशपांडे गिरणी चौक ते नेहरू चौक रस्ता व सिमेंट काँक्रीट नाली करणे तसेच राजेंद्र पेठे यांच्या घरासमोर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व नाली करणे तर युनूस शेख यांच्या घरापासून ते बालाजी राऊत यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली करणे, महादेव मंदिर समोरील पुलाला आरसीसी कंपाऊंड वॉल व आरसीसी भिंत बांधकाम करणे व जयंत महाजन यांच्या घरापासून ते जाधव यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली करणे या कामासाठी ३ कोटी ४८ लाख रुपये निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे या प्रभागातील विकासकामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नगरसेवक सुरज साळुंके व रूपाली आसलेकर यांनी केली आहे.
यावेळी आ. कैलास पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.