माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या कार्यकाळात आर्थिक गैरव्यवहार 

चौकशी करणेबाबत नागरिकांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
 
z

उस्मानाबाद - उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष मकरंद  राजेनिंबाळकर यांच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे. 


मकरंद शूरसेन राजेनिंबाळकर हे डिसेंबर २०१६ ते डिसेंबर २०२१ अशी पाच वर्ष नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते.त्यांनी त्यांच्या कार्यकाळात नगरपालिकेतील कांही अधिकारी,कर्मचारी व त्यांचे आर्थिक हितसंबंध असलेले कंत्राटदार यांना हाताशी धरून नियम धाब्यावर बसवून,भ्रष्ट मार्गांचा अवलंब करत जनतेच्या पैशाची लूट केली आहे.नागरिकांच्या पैशाचा योग्य विनियोग न केल्याने शहरात रस्ते खराब झाल्याने सर्वत्र धुळीचे लोट दिसून येत आहेत,सगळीकडे दुर्गंधी पसरली असून एकेकाळी स्वच्छ शहर म्हणून राज्यात ओळख असलेल्या शहराला बकाल स्वरूप आले आहे.धरणात मुबलक पाणी असताना नागरीकांना वेळेवर पिण्याचे पाणी देखील मिळत नाही.

मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मागील पाच वर्षांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळातील आर्थिक वर्ष साल सन २०२०-२०२१,२०२१-२०२२ व २०२२-२३ या वर्षातील बांधकाम विभाग,नगर रचना विभाग व लेखा विभागातील कामकाजामध्ये आर्थिक अनियमितता झालेली आहे.याची चौकशी व्हावी ,असे निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना, माजी गटनेते युवराज नळे,माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर,शहराध्यक्ष राहुल काकडे,माजी नगरसेवक दाजीप्पा पवार,सुजित साळुंखे,विनोद निंबाळकर, अमोल राजेनिंबाळकर,संदीप कोकाटे, संदीप इंगळे, उदय देशमुख, शेषराव उंबरे,जितेंद्र नाईकवाडी, कुलदीप भोसले,सागर दंडनाईक,अमित कदम,देशमुख, ओंकार देशमुख व इतर नागरिक उपस्थित होते.

From around the web