धाराशिव नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सत्काराने निरोप

 
s

धाराशिव - धाराशिव नगर परिषदेत प्रदीर्घ सेवेनंतर वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने भेटवस्तू देऊन भव्य सत्काराने निरोप देण्यात आला. कर्मचार्‍यांच्या सेवाकाळातील उल्लेखनीय कार्याचे उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

धाराशिव नगर परिषदेतील नगर अभियंता भारत अंबऋषी विधाते, पाणीपुरवठा विभागातील उद्धव कांबळे, मजूर रावसाहेब मांगोजी विधाते हे प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. यानिमित्ताने नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी बहुजन योद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे, माजी उपनगराध्यक्ष अतुल उर्फ राजाभाऊ बागल, मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय राऊत, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक वसुधा फड व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. तर नवननियुक्त नगर अभियंता वैजनाथ द्रुकर यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याधिकारी पृथ्वीराज पवार यांनी केले. कार्यक्रमाला नगर परिषदेचे माजी सभापती सिद्धार्थ बनसोडे, नगर अभियंता संदीप दुबे, विद्युत अभियंता कौस्तुभकुमार घंटे, जगदीश राजनिंबाळकर, रावसाहेब शिंगाडे, प्रदीप मोेटे, संतोष गायकवाड यांच्यासह नगर परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, मजूर तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

From around the web