उस्मानाबाद बाजार समिती सभापतीपदी दत्तात्रय देशमुख यांची निवड

 
उस्मानाबाद बाजार समिती सभापतीपदी दत्तात्रय देशमुख यांची निवड

उस्मानाबाद-  उस्मानाबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी पोहनेर, ता.उस्मानाबाद येथील दत्तात्रय देशमुख यांची निवड करण्यात आली  आहे. बाजार समितीचे सभापती अरुण वीर यांच्या अपघाती निधनामुळे सभापदीपद गेल्या काही दिवसांपासून रिक्त होते. नवीन चेअरमन निवडीसाठी आज बाजार समिती कार्यालयात झालेल्या बैठकीत  सर्वानुमते दत्तात्रय देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

निवड झाल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नूतन सभापती दत्तात्रय देशमुख यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी बाजार समितीचे संचालक तानाजी गायकवाड, निहाल काझी, दयानंद भोईटे तसेच प्रमोद पाटील, कुलभूषण माने व कार्यकर्ते उपस्थित होते.

From around the web