उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना डिपॉझिट रक्कमेचे वाटप सुरु 

 
a

उस्मानाबाद - विजय दंडनाईक यांच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स जानेवारी महिन्यात रद्द करण्यात आलं होत, त्यामुळे ठेवीदारांत  खळबळ उडाली होती. त्यावेळी आरबीआयने या बँकेच्या ठेवीदारांना दिलासा देताना सांगितलंय होतं की बँकेचे लायसन्स रद्द करणे आणि दिवाळखोरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येतील. लिक्विडीशनची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर प्रत्येक ठेवीदारास ठेवी विमा आणि पत हमी कॉर्पोरेशनकडून नेहमीच्या अटी व शर्तींनुसार, 50 हजारांच्या मर्यादेपर्यंतच्या ठेवीची परतफेड करण्याचा हक्क आहे. आरबीआयने सांगितले की, बँकेच्या बहुंताश ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण परतफेड डीआयसीजीसीकडून मिळेल.त्यानुसार थवी परत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 


वसंतदादा नागरी सहकारी बँक लि. उस्मानाबाद या बँकेच्या सर्व ठेवीदारांना ठेव रक्कम घेण्यासाठी एकाच दिवशी न येता, ठेवीदार पोहोच क्रमांक आणि दिलेल्या तारखेला येण्याचे आवाहन बँक व्यवस्थापकाकडून करण्यात आले आहे.

     बँकेच्या ठेवीदाराचे 11 जानेवारी-2021 या दिनांकावरील व्याजासह रु.5 लक्ष प्रती ठेवीदार मर्यादेपर्यंत क्लेम मंजुरीसाठीचा प्रस्ताव ठेव विमा व पतहमी महामंडळाने (डी.आय.सी.जी.सी.) मंजूर केलेला आहे. ज्या ठेवीदारांनी क्लेम फॉर्म बँकेत भरुन दिलेले आहेत. त्यांना बँकेने पोहोच क्रमांक देलेला आहे. कोविड-19 च्या अनुषंगाने बँकेत एकाच दिवशी गर्दी होऊ नये,यासाठी दिलेल्या तारखेस बँकेने आपल्याला दिलेला पोहोच क्रमांकानुसार बँकेत यावे.आपली मूळ कागदपत्रे (ठेव प्रमाणपत्र, बँक पासबुक व एक फोटो) बँकेत जमा करावीत.आपली ठेव रक्कम आपल्या खातेवर वर्ग करण्यात येतील.
    
    ज्या ठेवीदारांनी अदयापपर्यंत क्लेम फॉर्म भरुन दिलेले नाहीत.त्यांनीही आपले क्लेम फॉर्म बँकेत येऊन भरुन द्यावेत.क्लेम फॉर्म व के.वाय.सी ची कागदपत्रे दिल्याशिवाय ठेवी परत करता येणार नाहीत.  

दिनांक, ठेवीदाराच्या पोहोच क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

 • दि.07 जून2021- 1 ते 100,
 • दि.08 जून2021- 101 ते 200,
 • दि.09 जून-2021, 201 ते 300,
 • दि.10 जून-2021, 301 ते 400, 
 • दि.11 जून-2021, 401 ते 500, 
 • दि.14 जून-2021, 501 ते 600,
 • दि.15 जून-2021,601 ते 700,
 • दि.16 जून-2021, 701 ते 800, 
 • दि.17 जून-2021, 801 ते 900,
 • दि.18 जून-2021, 901 ते 1000
 •  दि.19 जून-2021, 1001 ते 1100,
 • दि.22 जून-2021, 1101 ते 1200,
 • दि.23 जून-2021, 1201 ते 1300, 
 • दि.24 जून-2021, 1301 ते 1400,
 •  दि.25 जून-2021, 1401 ते 1500,
 • दि.26 जून-2021, 1501 ते 1600,
 •  दि.29 जून-2021, 1601 ते 1700, 
 • दि.30 जून-2021, 1701 ते 1800, 
 • दि.01 जुलै-2021, 1801 ते 1900, 
 • दि.02 जुलै-2021, 1901 ते 2076.

   दिलेल्या तारखेव्यतिरिक्त बँकेत इतर ठेवीदारांनी येऊ नये. जे ठेवीदार नेमून दिलेल्या दिनांकास उपस्थित राहु शकनार नाहीत. त्यांनी महिन्याच्या दुस-या व चौथ्या शनिवार रोजी उपस्थित राहुन कागदपत्रे सादर करावीत. दोन्ही संधीत जे ठेवीदार उपस्थित राहु शकत नसल्यास अशा ठेवीदारास पुढे योग्य दिनांकास उपस्थित राहण्याची संधी देण्यात येईल, असेही बँक प्रशासनाने कळविले आहे. 

From around the web