उस्मानाबादेत देशपांडे स्टॅन्डजवळील भाजी मंडईत नागरिकांची तोबा गर्दी 

भाजी मंडई  ठरतेय कोरोना हॉटस्पॉट 
 
s

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरात कोरोना रुग्णाची संख्या प्रचंड वाढली असताना आणि दररोज मृत्यूचे तांडव सुरु असताना,  शहरातील देशपांडे स्टॅन्डजवळील  भाजी मंडईत नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. भाजी मंडई  कोरोना हॉटस्पॉट  ठरत असताना प्रशासनाची त्याकडे डोळेझाक होत आहे. 


शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रकोप चालूच असून रोज कितीतरी लोक मरण पावत आहेत,बाधीत रुग्ण तर मोठ्या संख्येने सापडत असताना प्रशासन मात्र हातावर घडी तोंडावर बोट करून बसले आहे, राज्य शासनाने कडक निर्बंध घातले असताना देखील सकाळी आठवडा बाजार तुडुंब भरून जात आहे.  तसेच बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 

बाजारात व्यापारी, ग्राहक विनामास्क बिनधास्त फिरत आहेत, मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यानंतर कोरोना वाढत आहे, प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळत आहे . प्रशासनाने विनामास्क फिरत असलेल्या नागरिकांना कडक शासन करावे तसेच दैनंदिन बाजारात गर्दी होऊ नये यासाठी उपाययोजना करावी, खबरदारी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे..

उस्मानाबादेत अत्यावश्यक दुकाने सोडून इतर दुकाने सुरु , प्रशासन झोपेत ... 

उस्मानाबाद शहरातील नेहरू चौकात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून , चप्पल प्लास्टिक, कापड,जनरल स्टोअर्स ची दुकाने अर्धे शटरउघडून चालू आहेत .
अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने चालू असल्याने नागरिक गर्दी करत आहेत. एकाचे बघुन दुसराही दुकान उघडत आहे. 

उस्मानाबादेत कोरोनाने हाहाकार माजवला असताना,  प्रशासन मात्र झोपेत आहे. 

From around the web