कोरोना रुग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शनची उपलब्धता करून देण्याची भाजपची मागणी

 

 जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर 

 कोरोना रुग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शनची उपलब्धता करून देण्याची भाजपची मागणी


     उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शनची उपलब्धता करून देण्याची मागणी भाजपच्या वतीने   जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. 


 या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या संख्येने प्रादुर्भाव होत असून  जिल्हा रुग्णालय व काही खासगी रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात   दाखल केले आहेत. या रुग्णांच्या  उपचारासाठी रेमडेसीवीर या इंजेक्शनची आवश्यकता असते, परंतु मागील काही दिवसापासून हे इंजेक्शन उस्मानाबाद जिल्हा व आजूबाजूच्या  लातूर व सोलापूर जिल्ह्यातही उपलब्ध होत नाही.  


विशेषतः खासगी रुग्णालयात ॲडमिट असलेल्या रुग्णासाठी आवश्यक असलेले रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्याकरिता  जिल्हा प्रशासनाने या इंजेक्‍शनचा साठा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून द्यावा व ज्या खाजगी रुग्णालयासाठी इंजेक्शनची गरज असेल त्या रुग्णालयास ते इंजेक्शन परत करण्याच्या अटीवर बँक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात यावे. जेणेकरून संबंधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास होणार नाही. 


हे निवेदन भाजप उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते जिल्हाधिकार्‍यांकडे देण्यात आले.याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस ऍड.  नितीन भोसले, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, जिल्हा सहप्रसिद्धीप्रमुख विनायक कुलकर्णी, देवा नायकल, भगवंत पाटील, अक्षय भालेराव उपस्थित होते.

 कोरोना रुग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शनची उपलब्धता करून देण्याची भाजपची मागणी


From around the web