आजपासून दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरु राहणार

 


  आजपासून दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरु राहणार


मुंबई - राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या घातल्यामुळे राज्य सरकारने आणखी अटी  शिथिल केल्या असून, उद्यापासून  (15 ऑक्टोबर ) दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरु राहणार आहेत. 


कोरोना महामारीमुळे मागील सहा महिन्यांपासून बंद असलेल्या मुंबई मेट्रोला अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. 1 ऑक्टोबरपासून अनलॉकच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून ठाकरे सरकारकडून काही निर्बंध शिथील करण्यात आले, याच पार्श्वभूमीवर मेट्रोसह अनलॉकच्या आणखी अटी शिथिल करण्यात आल्या आहे.


राज्य सरकारकडून नवे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात राज्य सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑक्टोबरपासून मेट्रो सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, दुकानांसाठीही दिलेले नियमही शिथिल करण्यात आले आहेत. यापुढे दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहे. तसेच, ग्रंथालये सुरू करण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था 31 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. परंतू, शाळांना ५० टक्के शिक्षक तसंच इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण, टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.


काय सुरू?

> मुंबई मेट्रो, ग्रंथालय, गार्डन, पार्क, व्यावसायिक प्रदर्शने (बिझनेस टू बिझनेस एक्झिबिशन्स).

> स्थानिक आठवडी बाजार, जनावरांच्या बाजारालाही परवानगी.

> केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासाची मुभा.

> पीएचडी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना १५ ऑक्टोबरपासून संस्थेत उपस्थित राहण्यास मुभा.

> शाळेतील ५०% शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १५ ऑक्टोबरपासून शाळेत बोलावण्यास परवानगी.

काय बंद?

> शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद

> सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क्स, थिएटर सभागृहे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद

> सामाजिक-राजकीय कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी

From around the web