आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या आमदार निधीतून १००० रेमडीसीविर उपलब्ध 

 
आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या आमदार निधीतून १००० रेमडीसीविर उपलब्ध

उस्मानाबाद  - आ. राणाजगजितसिंह पाटील  यांच्या स्थानिक विकास निधी मधून खरेदी करण्यात आलेल्या रेमडीसीविर इंजेक्शनच्या १००० वायल्स आज जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात रेमडीसीविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा भासत होता. 

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री  राजेश टोपे,  अन्न व औषध प्रशासन मंत्री  राजेंद्र शिंगणे यांच्याकडे जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता. तरी देखील जिल्हा प्रशासनाकडे कमी प्रमाणात वायल्स प्राप्त होत होत्या व मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नव्हता.त्यामुळे यात सुरळीतपणा आणण्यासाठी पर्याप्त साठ्याची आवश्यकता होती. 

आज आ.राणाजगजितसिंह पाटील  यांच्या आमदार निधीतून सुचविलेल्या १००० वाइल्स आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांसाठी रेमडीसीविरचा पर्याप्त साठा उपलब्ध झाला आहे. या साठ्यामुळे आता तुटवडा भासणार नाही. यातील ६०० वायल्स जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी तर ४०० वायल्स तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांसाठी देण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचित करण्यात आले आहे.

From around the web