शहर विकासाची कामे वेळेत तसेच गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत

- पालकमंत्री शंकरराव गडाख
 
s

उस्मानाबाद - शहर विकासाची कामे करताना ती कामे वेळेत पूर्ण केली पाहिजेत तसेच ती सर्व कामे गुणवत्तापूर्ण पणे करण्यात आली पाहिजेत,याकडे नगर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे,असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे केले.

           उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रात जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले.तेव्हा ते बोलत होते.यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर,उपनगराध्यक्ष अक्षय इंगवे, न.पा.चे मुख्य अधिकारी हरिकल्याण येलगट्टे,नगरसेवक तथा आरोग्य सभापती राणा के.बनसोडे,त्या त्या भागातील नगर सेवक,नागरिक उपस्थित होते.

            प्रथम श्री.धारासूर मर्दिनी देवी मंदिर कमान ते देवी मंदिर सीमेंट क्रॉग्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन ख्वॉजा नगरमध्ये पालकमंत्री श्री.गडाख त्यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर जाधववाडी रोड येथे गायकवाड घर ते बौध्द स्मशान भूमी पर्यंत रस्त्याच्या कामाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजने अंतर्गत कामाचे भूमी पूजन तर नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत रेल्वे स्टेशन रोड ते माणिक चौक जाणा-या रस्त्यांवर पूलांच्या बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
 

From around the web