पोलीसांच्या कामात अडथळा, गुन्हा दाखल

 
पोलीसांच्या कामात अडथळा, गुन्हा दाखल

तुळजापूर: तुळजापूर पो.ठा. चे पोउपनि श्री. गणेश झिंजुर्डे हे जमावबंदीच्या काळात पोलीस पथकासह कोरोना पार्श्वभुमीवर तुळजापूर शहरात दि. 23.03.2020 रोजी 20.45 वा. सु. गस्त करुन जनजागृती करत असतांना त्यांना रस्त्यात एक टोळके उभे असलेले दिसले. त्यास हटकता त्यातील अभिजीत राजा माने रा. हडको, तुळजापूर याने पोलीस पथकास धक्काबुक्की करुन “तुम्हास नोकरी करने मुश्कील करेन.” अशी धमकी देउन पोलीसांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या पोउपनि श्री. गणेश झिंजुर्डे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 24.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण

कळंब: एका 17 वर्षीय मुलीचे गावातीलच एका तरुणाने आमिष दाखवून दि. 20.3.2020 रोजी अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याच्या फिर्यादीवरुन संबंधीत तरुणाविरुध्द गुन्हा दि. 24.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

“जनावरांची निर्दयीपणे वाहतुक, गुन्हा दाखल.”

पोलीस ठाणे, भुम: राजा माणिक सोनार रा. नेवासा, जि.अहमदनगर हा दि. 24.03.2020 रोजी 00.10 वा. सु. गोलाई चौक, भुम येथे ट्रक क्र. एम.एच. 16 सीसी 2929 मधुन 9 म्हशी व 7 रेडके दाटीवाटीने भरुन, त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था न करता निर्दयीपणे वाहतुक करत असतांना पो.ठा. भुम यांच्या पथकास आढळले.  यावरुन वरील आरोपींविरुध्द प्राण्यांचा छळप्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दि. 24.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे


“आर्थिक व्यवहारावरुन मारहाण.”

नळदुर्ग: उमेश आण्णा सातपुते रा. डुक्करवाडी, ता. भुम हे दि. 22.03.2020 रोजी 19.00 वा. सु. दिपक टाक रा.सुकटा, ता.भुम यांना उसने दिलेले पैसे मागण्यासाठी त्यांच्या गावी गेले होते. यावेळी मौजे सुकटा येथील बबन गलांडे, सचिन मस्के, संपत नारायण गलांडे, शांताराम नरके, संतोष शिंदे, बलु कांबळे यांनी बेकायदेशीर जमाव जमवून उमेश सातपुते यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, वायरने, पट्ट्याने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या उमेश सातपुते यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 23.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

From around the web