आ. कैलास पाटील यांचा केवळ पब्लिसिटी स्टंट - नितीन काळे
Mar 14, 2020, 19:45 IST
उस्मानाबाद - शिवसेना आमदार कैलास पाटील यांच्यावर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पुन्हा एकदा टीकेचा बाण सोडला आहे. आ. पाटील पाटील विधिमंडळात जे प्रश्न मांडतात ते केवळ पब्लिसिटी स्टंट आहे, असा आरोप काळे यांनी केला आहे.
काळे यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पावरील अधिवेशनात विभागवार मागण्या वरील चर्चेत सहभाग घेत जे मुद्दे मांडले त्याचा डांगोरा पिटायला सुरू केला आहे.वास्तविक पाहता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात मुद्दे उपस्थित करण्याच्या ऐवजी आपल्या सत्तेचा उपयोग करून त्यांची सोडवणूक करणे अपेक्षित असते.मात्र आमदार महोदय तसे न करता मंत्री महोदयांकडे यापूर्वीच मांडलेल्या प्रश्नांची पुन्हा पुन्हा उजळणी करून त्याची प्रसिद्धी करण्यातच धन्यता मानत आहेत.
दरम्यान मंत्री महोदयांनी त्यांच्या या चर्चेला उत्तर देतानाचा विडिओ कांही आम्हाला बघायला मिळाला नाही.आमदार महोदयांनी तो विडिओ देखील जनतेला उपलब्ध करून द्यावा.म्हणजे याबाबत नेमक खर काय ते जनतेला समजेल.
आमचे आमदार महोदयांना आव्हान आहे की त्यांनी जनतेच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
१) आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मंत्री महोदयांनी काय उत्तर दिले ?
२) किती दिवसात हे विषय मार्गी लागतील ?
३) सदर विषयांसाठी वित्तीय तरतूद केली आहे का असल्यास किती केली आहे ?
शिवसेना आमदार कैलास पाटील हे शांत स्वभावाचे असून, टीकेला कधीच प्रतिउत्तर देत नाहीत. मात्र त्यांचे कार्यकर्ते काळे यांचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतात, त्यामुळे काळे यांच्या या टीकेला आ. पाटील यांचे कार्यकर्ते कसा पलटवार करणार ? याकडे लक्ष वेधले आहे.