उस्मानाबाद जिल्ह्यात मराठा आंदोलनाचे बिगुल वाजले, तुळजापूरातून सुरुवात

 
 उस्मानाबाद जिल्ह्यात मराठा आंदोलनाचे बिगुल वाजले, तुळजापूरातून सुरुवात


उस्मानाबाद   : उस्मानाबाद जिल्ह्यात मराठा आंदोलनचे बिगुल पुन्हा एकदा वाजले असून,  येत्या ९ ऑक्टोबरला तुळजापूर शहरात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच १०  ऑक्टोबरला  महाराष्ट्र बंद मध्ये सहभाग आणि त्यानंतर जिल्ह्यातील खासदार- आमदार यांच्या घरासमोर ढोल वाजून जनआक्रोश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


सुप्रीम कोर्टाने मराठा समजला दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आता राज्यातील मराठा समाज पुन्हा आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यातही मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले असून याची सुरवात तुळजापूरातून होणार आहे. 


यावेळी बैठकीमध्ये सहभागी अनेक तरुणांनी मराठा समाजाची बाजू न्यायालयात शासनाने योग्यरीतीने न मांडल्यामुळे शासनाचा निषेध केला.  तसेच नरेंद्र मोदी यांनीही छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांच्या भेटीसाठी केलेल्या मागणीवर कुठलीच भूमिका न घेतल्यामुळे पंतप्रधान मोदी यांचाही निषेध करण्यात आला.


या बैठकीत अनेकांनी आक्रमक आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केला.  मात्र मागे ज्याप्रमाणे लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे काढले त्याच पद्धतीने सध्याचे आंदोलन हि करण्याच्या भूमिकेवर सर्वांचे एकमत झाले. 



From around the web