उस्मानाबाद जिल्हा विधिज्ञ मंडळातर्फे प्रमुख जिल्हा न्यायाधीश पेठकर यांचे स्वागत
उस्मानाबाद- जिल्हा विधीज्ञ मंडळातर्फे उस्मानाबाद येथे नव्याने रुजू झालेले प्रमुख जिल्हा न्यायाधीश पेठकर तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव व्ही एस यादव , प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कळसकर , मोमीन ,श्रीमती खान मॅडम यांचे स्वागत करण्यात आले. विधीज्ञ मंडळात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अँड नितीन भोसले हे होते .व्यासपीठावर महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अँड मिलिंद पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष नितीन भोसले यांनी प्रास्ताविकपर आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये बार आणि बेंच ह्या दोघांनी मिळून समन्वयातून काम केले तर न्यायालयीन कामकाजात आणखी जास्त सुसूत्रता आणता येईल तसेच कोविड काळानंतरची परिस्थिती यामध्येही न्यायालयीन कामकाजात बराच खंड पडला असल्याने आत्ता प्रलंबित प्रकरणे तातडीने निघाली काढण्यात यावीत.
यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश पेठकर यांनी मार्गदर्शन करताना विधीज्ञ मंडळास पूर्ण सहकार्य करण्याची हमी दिली. तसेच मागील लोक आदालत मध्ये मंडळाने व न्यायालयाने पुढाकार घेऊन प्रकरणी मिटवले याबद्दल वकील वर्गाची अभिनंदन केले तसेच यापुढेही सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी अँड मिलिंद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
CLAT या परीक्षे मार्फत नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी साठी निवड झालेले विनय विजय माने , तेजस रोहिदास तांदळे यांचा सत्कार जिल्हा विधिज्ञ मंडळातर्फे प्रमुख जिल्हा न्यायाधीश पेटकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा न्यायाधीश नेर्लेकर , श्रीमती मखरे मॅडम ,जगताप , सर्व न्यायिक अधिकारी, विधिज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष अतुल देशमुख, के. बी. डेंगळे, सचिव तानाजी चौधरी, कोषाध्यक्ष भाग्यश्री कदम, सचिव प्रवीण शेटे अरुणा गवई, महिला प्रतिनिधी आकांक्षा माने अश्विनी सोनटक्के, ज्येष्ठ विधिज्ञ ,महिला विधिज्ञ, ज्युनियर विधीज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड तानाजी चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन अँड प्रवीण शेटे यांनी केले