उस्मानाबादेत एकाच दिवशी दोघांची फसवणूक 

 
उस्मानाबादेत एकाच दिवशी दोघांची फसवणूक

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरात ऑनलाइन फसवणुकीचे  प्रकार वाढले असून, आनंदनगर पोलीस स्टेशन मध्ये एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. 

आम्रपाली कांबळे, रा. उस्मानाबाद यांना दि. 26.10.2020 रोजी 11.48 वा. सु. एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. कॉल करणाऱ्या समोरील व्यक्तीने आपण ॲमेझॉन कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असुन, “तुम्ही परत केलेल्या पार्सलचे पैसे परत मिळतील.” असे आम्रपाली कांबळे यांना सांगुन फोनवर बोलते ठेवले. त्याने मागीतल्या प्रमाणे बँक खात्याची माहिती आम्रपाली यांनी काहीही विचार न करता त्यास दिली. त्या नंतर मोबाईल वर आलेल्या संदेशाची वाचून खात्री न करता त्यातील आम्रपाली यांनी त्या समोरील व्यक्तीस सांगीतले. या माहितीच्या सहायाने त्या व्यक्तीने आम्रपाली यांच्या बँक खात्यातील 73,997 ₹ रक्कम ऑनलाईन पध्दतीने इतर खात्यात स्थलांतरीत केली.अशा मजकुराच्या आम्रपाली कांबळे यांनी काल दि. 06.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी), 66 (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


प्रशांत गुणवंत चौधरी, रा. बँक कॉलनी, उस्मानाबाद यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र च्या खात्यातील 57,500 ₹ रक्कम दि. 27.10.2020 ते 04.11.2020 दरम्यान वेळोवेळी युपीआय ॲपलीकेशनद्वारे इतर खात्यांवर अज्ञात व्यक्तीने वळवली. अशा मजकुराच्या प्रशांत चौधरी यांनी दि. 06.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web