उस्मानाबादेतील मुख्याध्यापक एक हजार लाच घेताना चतुर्भुज 

 
उस्मानाबादेतील मुख्याध्यापक एक हजार लाच घेताना चतुर्भुज

उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील चिखली येथील गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक शाहूराज दत्तू भोजगुडे ( रा. समतानगर, उस्मानाबाद )  यास एक हजार लाच घेताना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारदार  यांचे DCPS(परिभाषिक अंशदान निवृत्ती योजना ) हे  NPS(केंद्रीय राष्ट्रीय निवृत्ती योजना ) मध्ये वर्ग करण्यासाठी  लोकसेवक नामे  शाहूराज दत्तू भोजगुडे , वय 54 वर्ष,व्यवसाय-नोकरी  ( मुख्याध्यापक, गांधी विद्यालय, चिखली, ता. जि. उस्मानाबाद रा. समता नगर उस्मानाबाद) यांनी तक्रारदार याना 1000/- रुपये लाच रकमेची  मागणी करून   1000/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. याबाबत  पो स्टे बेंबळी, ज़िल्हा उस्मानाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद  यांचे  मार्गदर्शनाखाली प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. उस्मानाबाद यांनी केली.

याकामी त्यांना पोलीस अंमलदार दिनकर उगलमूगले , अर्जुन मारकड, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, चालक दत्तात्रय करडे यांनी मदत केली.
कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असतील तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००)  यांनी केले आहे.

From around the web