रांगोळी स्पर्धेने मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सवास सुरुवात

समितीच्या वतीने आठवडाभर भरगच्च कार्यक्रम -  प्रेमाताई पाटील
 
रांगोळी स्पर्धेने मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सवास सुरुवात

उस्मानाबाद -  दरवर्षी प्रमाणे याही वर्षी  मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती उस्मानाबादच्या वतीने येत्या आठवडाभर भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी उस्मानाबादकरांसाठी आयोजित केलीआहे. त्याची सुरुवात आज रांगोळी स्पर्धेने करण्यात आली. 

ही स्पर्धा श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात पार पडली. स्पर्धेच्या प्रारंभी मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा नगरसेविका सौ.प्रेमाताई सुधीर पाटील यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सामाजिक सलोखा आणि प्रबोधनावर आधारीत या रांगोळी स्पर्धेचे शहरातील 300 स्पर्धकांनी भाग घेतला. विशेष म्हणजे मुलांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता.

यावेळी समितीच्या अध्यक्षा सौ प्रेमाताई पाटील, कार्याध्यक्ष अतुल कावरे, मनोज देशमुख, अभय तांबे, रेहमून्निसा शेख, स्वप्नील पाटील, धनश्री कोळपे, मनोज उंबरे, दिलीप आदटराव, सौ माधुरी गरड, सौ.सोनाली पडवळ, अर्चना देशमुख यांचा सत्कार आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्राचार्य प्रा.साहेबराव देशमुख यांनी केला. यावेळी डाॅ.सुभाष वाघ, भालचंद्र जाधव, अग्निवेश शिंदे, डाॅ.सौ.मंजुळा आदित्य पाटील, पर्यवेक्षक प्रा.तानाजी हाजगुडे, प्रा.नंदकुमार नन्नवरे, नुतनचे मुख्याध्यापक प्रदीप गोरे, प्रा.विवेक कापसे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

येणा-या आठवड्यात मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती उस्मानाबादच्यावतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यामधे भोसले हायस्कूल मध्ये दि. 8 जानेवारीला आनंद मेळावा, तर 9 जानेवारीला काव्यवाचन आणि संगीत खुर्ची, दि.11 जानेवारी रोजी जिजाऊ चौक बार्शी नाका येथे भव्य रक्तदान शिबिर, तर स्वधार मतिमंद मुलींच्या वसतिगृह येथे फळ वाटप कार्यक्रम, दि.12 जानेवारी रोजी सकाळी जिजाऊ पुजन व दुपारी स्त्री रुग्णालय येथे मातांचा साडी-चोळी देवून सत्कार करण्यात येणार आहे.

 समितीच्या वतीने दिले जाणारे विविध पुरस्कार व भव्य शोभा यात्रा फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची परिस्थिती पाहून आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीच्या अध्यक्षा सौ.प्रेमाताई पाटील यांनी दिली. आणि या होणा-या सर्व कार्यक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. 


सदरील रांगोळी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा.सौ.सरोज साळुंके, प्रा.सौ.दिपाली बंडगर, प्रा.प्रगती वाघमारे, प्रा.सौ.लक्ष्मी भोसले, प्रा.सौ.शिवकन्या सुरवसे, प्रा.सौ.ज्योती शिंदे, प्रा.सौ.कविता वडगणे, प्रा.सौ.शुभांगी माने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.प्रिती मेटे, प्रास्ताविक प्रा.सौ.सुप्रिया मिरगणे  तर आभार प्रा.सौ.अनिता तुंगीकर यांनी मानले.
 

From around the web