उस्मानाबादजवळ कारला ट्रकची  धडक, दोन जखमी 

 
उस्मानाबादजवळ कारला ट्रकची  धडक, दोन जखमी

उस्मानाबाद :  चालक- रामहरी बाळु लोकरे, रा. लवुन, ता. माढा यांनी दि. 26.11.2020 रोजी 16.00 वा. सु. येडशी येथील लातुर- बार्शी रस्त्यावर मिनीट्रक क्र. एम.एच. 45 एएफ 3573 हा निष्काळजीपणे, हयगईने चालवून कार क्र. एम.एच. 12 जीव्ही 2794 ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात कार चालक- पांडुरंग अशोक हराळे, रा. बीड यांसह कारमधील संतोष सानप हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नमूद चालक मिनीट्रकसह घटनास्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या पांडुरंग हराळे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा दि. 05.12.2020 रोजी नोंदवला आहे.

पाहिजे आरोपी अटकेत

 उस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. गु.र.क्र. 322 / 2019 भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 या रस्ता अपघाताच्या गुन्हा तपासात दर्शन सुधाकर माळाळे, रा. भिमनगर, उस्मानाबाद हा पोलीसांना तपासकामी पाहिजे (Wanted) होता. स्था.गु.शा. च्या पथकाने त्यास आज दि. 06.12.2020 रोजी उस्मानाबाद शहरातून ताब्यात घेउन आनंदनगर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

  परंडा: काल दि. 05.12.2020 रोजी माणकेश्वर येथील एका पत्रा शेडमध्ये परंडा पो.ठा. च्या पथकाने छापा टाकला. यावेळी हनुमंत हरीदास पांचाळ, रा. माणकेश्वर, ता. भुम हा देशी दारुच्या 24 बाटल्या विनापरवाना बाळगलेला असलेला आढळला. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web