अझहर पठाण यांची जुलूस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड
Aug 26, 2023, 15:53 IST
धाराशिव ( उस्मानाबाद ) - येथील सामाजिक कार्यकर्ते अझहर पठाण यांची पैगंबर जयंतीनिमित्त निघणाऱ्या जुलूस कमिटीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.
२८ सप्टेंबर २०२३ रोजी इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर हजरत साहब यांची जयंती असून, यादिवशी मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. यानिमित्त धाराशिव ( उस्मानाबाद ) शहरात रोजी जुलूस - मिरवणूक काढली जाते. या जुलूस कमिटीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अझहर पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गा मध्ये पार पडलेल्या या बैठकीस प्रमुख मौलवी आणि मुस्लिम नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. या निवडीबद्दल जिल्ह्यातील अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.