उस्मानाबाद जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. नितीन भोसले

चुरशीच्या लढतीत २९ मतांनी विजय
 
उस्मानाबाद जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. नितीन भोसले

 उस्मानाबाद  - अत्यंत चुरशीच्या झालेल्या जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अ‍ॅड. नितीन भोसले यांचा २९ मतांनी विजय झाला आहे. त्यांना एकूण २४५ मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अ‍ॅड. विष्णू डोके यांना २१६ मते मिळाली आहेत. 

जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या निवडणुकीत अध्यक्ष वगळता अन्य पदाधिकार्‍यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत. अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. विष्णू डोके, अ‍ॅड. नितीन भोसले व अ‍ॅड. भाऊसाहेब बेलुरे यांनी उमेदवारी दाखल केली होती. मतदानाच्या एक दिवस अगोदर अ‍ॅड. भाऊसाहेब बेलुरे यांनी अ‍ॅड. विष्णू डोके यांना जाहीर पाठींबा दिला होता. गुरूवारी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर लागलीच मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात आला. यात  अ‍ॅड. नितीन भोसले यांचा २९ मतांनी विजय झाला.

 अ‍ॅड. विष्णू डोके यांना एकूण २१६  तर भोसले यांना २४५  मते मिळाली आहेत. अ‍ॅड. डोके यांना पाठींबा दिलेले उमेदवार अ‍ॅड. भाऊसाहेब बेलुरे यांना केवळ पाच मते मिळाली असून नोटाला चार मते पडली आहेत. 

निवड प्रक्रियेत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. शेषेराव काजळे यांनी काम पाहिले तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. ज्योती बडेकर, अ‍ॅड. प्रतीक देवळे तर अ‍ॅड. विलास चौरे यांनी काम पाहिले. निवडीनंतर अ‍ॅड. भोसले यांच्या समर्थकांनी पुष्पहार घालून, पेढे भरवून व गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला.

असे आहे नवीन विधीज्ञ मंडळ 
अध्यक्ष -  अ‍ॅड. नितीन भोसले, उपाध्यक्ष -अ‍ॅड. अतुल देशमुख, अ‍ॅड. क्रांतीसिंह ढेंगळे, सचिव -अ‍ॅड. तानाजी चौधरी, कोषाध्यक्ष - भाग्यश्री कदम-जोमदे, सहसचिव -अ‍ॅड. अरूणा गवई, महिला प्रतिनिधी- अ‍ॅड. आकांक्षा माने, अ‍ॅड. अश्विनी सोनटक्के 

From around the web