उस्मानाबादेत कोरोनामुळे आणखी एका वकिलांचा मृत्यू 

एका महिन्यात १४ वकिलांचा मृत्यू 
 
उस्मानाबादेत कोरोनामुळे आणखी एका वकिलांचा मृत्यू

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत १०९३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.गेल्या एक महिन्यात जवळपास ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. यातून वकीलही  सुटू शकले नाहीत. गेल्या एक महिन्यात १४ वकिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अँड नितीन भोसले यांनी सांगितले. 

जिल्हा विधिज्ञ मंडळाचे सदस्य,अ‍ॅड अजित संभाजीराव यादव यांचे आज सोलापुर येथे उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले आहे. यापूर्वी अ‍ॅड. राम अनंतराव कुलकर्णी ( वय ४४ ), अ‍ॅड राजेश अंधारे , अ‍ॅड .शंकर आंबेकर (नाना), ऍड. दत्तात्रय उर्फ आबा बारखडे ( वय ६२ ) अँड भारती रोकडे ( वय ४६ )  अँड विनोद गंगावणे ( वय ४५  ) अँड बापूसाहेब गंजे (वय ५३  ) अँड नारायण वडणे ( वय ४५  ) व उमरगा येथील ॲड.रवींद्र बिराजदार ( वय ४४  ), अँड ऋग्वेद कुलकर्णी ( कळंब ) ऍड.अरुण कालिदास महामुनी आदी वकिलांचा  कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

वकीलासाठी कसलेही सुरक्षा कवच नाही,त्यांच्या मागे वारसांना कसलीही आर्थिक सुरक्षा नाही, वकिलाचा अनेक बाबतीत थेट संपर्क पक्षकाराशी येतो त्यामुळे वकिलांना कोरोना संसर्ग जास्त आहे. वकील लोकांना तातडीने लसीकरण करण्याची गरज आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा वकिलांचा मृत्यू या लाटेत झाला आहे.अनेक वकिलांचे नातेवाईक यात बळी पडले आहेत.वकिलांच्या वारसांना शासनाने मदत करण्याची आवश्यकता आहे. शासनाने वकिलांच्या वारसांना तात्काळ 25 लाख रुपयांची मदत करावी,  अशी मागणी जिल्हा विधिज्ञ मंडळचे अध्यक्ष अँड नितीन भोसले यांनी केली आहे.
 

From around the web