अज्ञात वाहनाच्या धडकेत १८ वर्षीय तरुण ठार

 
अज्ञात वाहनाच्या धडकेत १८ वर्षीय तरुण ठार

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहराच्या बायपास परिसरात  अपघात वाढले आहेत. अज्ञात वाहनाच्या धडकेत शहरातील १८ वर्षीय तरुण ठार झाला असून, अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही  घटना  तेरणा टी जंक्शन परिसरात मंगळवारी (दि.१५) रात्री घडली. 

राष्ट्रीय महामार्गावर वाहन निष्काळजीपणे चालवून रस्त्याने पायी जाणाऱ्या अभिजीत पवार (रा. उस्मानाबाद) व लक्ष्मण जकाते (१८,रा. सांजा) यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात अभिजीत पवार ठार झाले तर लक्ष्मण जकाते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर अज्ञात वाहनाने घटनास्थळावरुन वाहनासह पळ काढला. याप्रकरणी शनिवारी आनंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

निष्काळजीपणे कार चालवून एकास धडक

 ढोकी येथील बाबा पेट्रोलियम विक्री केंद्रासमोर रस्त्याच्या बाजुस लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या नितीन अंगरखे यांना कारने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर अज्ञात चालकाने जखमीस वैद्यकीय उपचारासाठी घेऊन न जाता व पोलिस ठाण्यास माहिती न देता घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. याप्रकरणी अंगरखे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या माहितीवरून ढोकी पोलिस ठाण्यात शुक्रवारी  गुन्हा नोंद झाला.

From around the web