कचरा डेपोत अपहार झाल्याचा आरोप , कचऱ्याची होळी करुन निषेध 

उस्मानाबादेत सत्ताधारी नगर परिषदेच्या विरोधात भाजपाचे  आंदोलन 
 
s

उस्मानाबाद - कचरा डेपोवरील बायोमॅनींगचे बोगस काम दाखवुन नगर परिषदेने जनतेच्या पैशाचा अपहार केल्याचा आरोप करीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी  आज निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करीत कचऱ्याची होळी केली. 


आ.राणाजगजितसिंह पाटील व आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात नगर परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांकडुन कचरा डेपोच्या अडुन केल्या जाणाऱ्या पैशाच्या अपहार प्रकरणी तात्काळ चौकशी करुन संबंधीतांवर कारवाई करावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर परिषद धाराशिव समोर कचऱ्याची होळी करुन नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनील काकडे नगर परिषदेतील सत्ताधार्यांचे ताशेरे ओढले, आणि नंतर जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांनी  नगर परिषदेत चाललेल्या अपहाराबाबत आपले मत विषद केले.

sd

उस्मानाबाद शहरात मोठया प्रमाणामध्ये अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य सातत्याने दिसुन येत आहे. ठिक ठिकाणी कचऱ्याचे ढिग, घाण पाण्याचे डबके, मोकाट जनावरांचे व डुकरांचे सुळसुळाट दिसुन येत आहेत त्यामुळे रहदारीवर परिणाम होऊन दररोज छोटया मोठया दुर्घटना मेन रस्त्यावरती सातत्याने होत आहेत.शहरामध्ये काही सत्ताधारी लोक प्रतिनिधी तसेच काही नगरसेवकांचे आर्थिक हित संबंध जोपासुन काम करत असल्याचे सातत्याने दिसुन येत आहे. तसेच दैनंदिन स्वच्छतेच्या कामामध्ये ज्या आवश्यक गरजा आहेत त्यामध्ये रस्ते स्वच्छ करणे, नाली सफाई करणे, घंटागाडीने घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, या कामात नगर पालीका सत्ताधाऱ्यांचे लक्ष नाही मात्र कामाची रितसर बीले दाखवुन प्रचंड पेशांचा अपहार झाल्याचे दिसुन येत आहे.

कचरा डेपोवरील बायोमॅनींगचे बोगस काम दाखवुन नगर परिषदेने जनतेच्या पैशाचा अपहार करुन सत्ताधाऱ्यांनी आपल्या आर्थिक तुंबडी भरुन घेतले असुन या स्वच्छता कचऱ्याच्या कामामधील आर्थिक गैरव्यवहार करुन समस्त उस्मानाबाद मधल्या जनतेचे आरोग्य धोक्यात घालुन जनतेच्या पैशाचा चुराडा केला आहे.

d

वरील कामाच्या सर्व तक्रारींची दखल घेऊन होत असलेला अपहार व नागरीकांची गैरसोय लक्षात घेऊन सदरील कामाच्या चौकशीचे आदेश देऊन त्याची रितसर चौकशी पुर्ण होई पर्यंत त्या सर्व कामांचे उर्वरीत देयके व अनामत रक्कम देण्यात येऊ नये, असे निवेदन न.प.मुख्याधिकारी यांना देण्यात आले. अन्यथा पुढील काळात भारतीय जनता पार्टीच्या वतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला.

या प्रसंगी भाजपचे सुनील काकडे, अभय इंगळे, राजसिंह राजेनिंबाळकर, राहुल काकडे, अर्चना अंबुरे, प्रवीण सिरसाठे, दाजीप्पा पवार, प्रवीण पाठक, अभिजित काकडे, संदीप साळुंके, सुजित ओव्हाळ, इंद्रजित देवकते, पांडुरंग लाटे, लक्ष्मण माने, शेषेराव उंबरे, ओम नाईकवाडी, ॲड. कुलदीपसींह भोसले, अभिराम पाटील, पृथ्वीराज दंडणाईक, प्रीतम मुंडे यांच्यासह शहरातील भाजपचे असंख्य पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने आंदोलनात सहभागी होते.

From around the web