उस्मानाबादेत कैदी कक्षातून कुख्यात आरोपी पसार (Video)

मोस्ट वाँटेड आरोपी पसार झाल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह !
 
उस्मानाबादेत कैदी कक्षातून कुख्यात आरोपी पसार (Video)

उस्मानाबाद-  भंडारी शिवारातील  एका  हॉटेल मालकावर गोळीबार करणाऱ्या एका आरोपीस कामगारांनी पकडून बेदम चोप दिला होता, त्याच्यावर गेल्या तेरा दिवसापासून उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. हा आरोपी मंगळवारी पोलिसांच्या हातावर तुरी देवून कैदी कक्षातून पसार  झाला आहे. 

३  फेब्रुवारी रोजी  दुपारी भंडारी शिवारात हॉटेल रिलॅक्स येथे किरकोळ कारणावरून हॉटेल मालक व या प्रकरणातील आरोपींमध्ये वाद होऊन थेट हॉटेल मालक बाळासाहेब माेरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला.  यातील आरोपी अभिषेक उद्धव विश्वकर्मा यास हॉटेलवरच्या  कामगारांनी पकडून बेदम चोप दिला होता. त्याच्यावर गेल्या तेरा दिवसापासून उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. 

हा आरोपी जिल्हा शासकीय रुग्णालायातील  कैदी कक्षातून मंगळवारी सायंकाळी पसार झाला आहे. यावेळी ड्युटीवरील पोलीस झोपा काढत होते का ? असा प्रश्न विचारला जात आहे. 

  • अभिषेक विश्वकर्मा हा  कुख्यात आरोपी असून, त्याच्यावर महाराष्ट्रात जवळपास २२ गुन्हे दाखल आहेत. हा आरोपी महाराष्ट्रातील अनेक पोलीस स्टेशनला हवा होता. 
  • भंडारी शिवारातील हॉटेल रिलॅक्स मालकावर गोळीबार केल्यानंतर हॉटेलमधील कामगारांनी त्यास पकडून बेदम चोप दिला होता, त्यात तो गंभीर जखमी झाला होता, नंतर कामगारांनी बेंबळी पोलिसाना बोलावून त्यांच्या ताब्यात दिला होता. 
  •  पोलिसांच्या तावडीत आपोआप  सापडलेला  हा आरोपी सध्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात होता, मात्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तो दाखल असताना चोख बंदोबस्त ठेवण्यात न आल्यामुळे तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी ठरला. 
  • या प्रकरणी आता नेमकी कुणावर कारवाई होणार ? याकडं लक्ष वेधले आहे. याप्रकरणी किमान तीन पोलीस कर्मचारी निलंबित होण्याची शक्यता आहे. 

हाच तो आरोपी

 Video


 

From around the web