उस्मानाबाद बसस्थानकावर चोरट्याने महिला वकिलांचा स्मार्टफोन पळविला 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  - ॲडव्होकेट प्रिती परदेशी या  दिनांक 29 जुन रोजी उस्मानाबाद बस स्थानकात बस मधे चढत असतांना त्यांच्या बटव्यातील  स्मार्टफोन अज्ञाताने चोरुन नेला. अशा मजकुराच्या ॲडव्होकेट प्रिती परदेशी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग: भिमाशंकर जमादार, रा.निलेगाव यांनी आपली गाय व दोन वासरे ही शिवारातील शेतात दावणीस बांधुन ठेवली होती. ती जनावरे दिनांक 28-29 जुन दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी:  तुकाराम शिंदे, महेश शेटे  हे दोघे दिनांक 29 जुन रोजी ढोकी येथील ‍साप्ताहीक बाजारात खरेदी करत असतांना त्या दोघांच्या खिशातील दोन स्मार्टफोन अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या तुकाराम शिंदे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद -   दत्तात्रय शिनगारे, रा. खामगाव यांनी दि 28 जुन रोजी उस्मानाबाद जिल्हा व सामान्य रुग्णालयाच्या आवारात लावलेली  हिरो एच एफ डिलक्स मोटारसायकल  क्रमांक एम एच 25 एजी 6542 ही  अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शिनगारे यांनी  दिनांक 29 जुप रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web