उस्मानाबाद शहरातील "या" रस्त्यावर बंदी आदेश लागू
उस्मानाबाद - मराठवाडा मुक्ती संग्रामच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त 17 सप्टेबंर 2021 रोजी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम सकाळी ठिक 8:45 वाजता आणि राष्ट्रध्वजारोहणाचा मु्ख्य शासकीय समारंभ सकाळी ठिक 900 वाजता पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. त्यानिमित्ताने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते शिंगोली येथील सर्कीट हाऊस पर्यंतच्या रस्त्यावर 16 व 17 सप्टेंबर रोजी बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमा दिवशी विविध मागण्या संदर्भात लोक, संघटना, पक्ष आणि कार्यकर्ते हे जिल्हाधिका कार्यलयासमोर उपोषण, धरणे, मोर्चा, आत्मदहन, रस्तारोको अशा कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्याअनुषंगाने उस्मानाबाद शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शिंगोली सर्कीट हाऊस पर्यंत दि.16 सप्टेंबर 2021 रोजीच्या रात्री 12 वाजल्यापासून दि.17 सप्टेंबर 2021 रोजीच्या रात्री 12 पर्यंत आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास बंदी आदेश काढणे आवश्यक असल्याचे जिल्हा दंडाअधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या पुर्वतयारी बैठकीत ठरले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये तसेच श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळयापासून ते शिंगोली येथील सर्कीट हाऊसपर्यंत ध्वजारोहणाच्या दिवशी उपद्रव कमी करण्यासाठी तसेच आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणे आवश्यक असल्याने प्रतीबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.