उस्मानाबाद नगर पालिकेतून लाखो रुपयाची भंगार चोरी 

तेरणा कारखान्याच्या पावलावर पाऊल ठेवत भंगारची चोरी झाल्याचा भाजपचा आरोप 
 
osmanabad np

धाराशिव ( उस्मानाबाद )  -  नगर परिषदेच्या आवारातून भंगार साहित्य चोरी झाल्याचे प्रसार माध्यमातून कळाल्यानंतर आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचनेनुसार भाजपा व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यानी नगर पालीकेच्या आवारात जावून शहानिशा केली असता चोरी झाल्याचे निर्दशनास आले . 


सार्वजनीक सुटटीच्या दिवशी विना परवाना खाजगी वाहनातून लाखो रूपयाचे भंगार चोरून विकण्यात आले असून या प्रकरणात सी.सी.टी.व्ही फुटेज तपासून पहावे अशी सुचना केली, मागील काळामध्ये नगर पालिकेने शहरातील अतिक्रमणे हटवून ते सामान ज्यामध्ये पत्रे, अँगल, लोंखडी चॅनल, पाईप व इतर सामान नगर पालिकेच्या आवारात आणून ठेवले होते. त्याचप्रमाणे न वापरातील बरेच भंगार हे जिजाऊ उद्यानमध्येही ठेवलेले होते. तेथील ही भंगार साहित्य चोरी गेल्याचे निर्दशनास आले.  या सर्व चोरी प्रकरणामध्ये नगर  पालिकेचे कर्मचारी व हितसंबधीत ठेकेदार असण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे या भंगार चोरी प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर जे दोषी आढळतील त्यांच्यावर जेरबंद करून गुन्हे दाखल करून   योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी  धाराशिव जिल्हाहंडीकऱ्यांकडे केली आहे. 

d

          यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, भाजपा जिल्हा सचिव संदीप कोकाटे, शहर अध्यक्ष राहूल काकडे, युवा मोर्चाचे  सुजित साळुंके ,माजी नगरसेवक दत्ता पेठे, बापू पवार ,विनोद निंबाळकर, अमोल राजेनिबांळकर,   प्रविण पाठक, मोहन मुंढे, संदिप इंगळे,  सलमान शेख, गणेश एडके, श्रीराम मुंबरे,  रोहित देखमूख, बालाजी मडके, सुनिल पंगुडवाले, प्रसाद मुंढे, धनराज नवले, सार्थक पाटील, जितेंद्र नाईकवाडी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थीत होते. 

From around the web