उस्मानाबादच्या २० प्रभागातील ४१ जागांचे आरक्षण जाहीर

सर्वसाधारण व राखीव महिलांसाठी २४ जागा
 
sd

उस्मानाबाद - उस्मानाबाद नगर परिषद प्रभाग सोडत काढण्यात आली आहे. यात शहरातील २० प्रभागातील नप सदस्य पदाच्या ४१ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी १६, अनुसूचित जाती महिला ४, अनुसूचित जाती सर्वसाधारण ३ तर अनुसूचित जमाती महिला प्रवर्गाच्या एका जागेचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली व नप मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत  दि.१३ जून रोजी उस्मानाबाद तहसील कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. नव्या प्रभागरचनेनुसार शहरात २० प्रभाग तर सदस्य संख्या ४१ झाली आहे. पूर्वी १९ प्रभाग व ३९ सदस्य संख्या होती. यात एक प्रभाग तर सदस्य संख्येत २ ने वाढ झाली आहे. या २० प्रभागाचे आरक्षण चिठ्ठीद्वारे सोडत काढून जाहीर करण्यात आले. नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांतून होणार असल्याने नगरसेवक पदाला देखील महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आगामी राजकीय घडामोडीकडेच लक्ष वेधले आहे.

प्रभाग १ अ -सर्वसाधारण महिला, १ ब - अजा सर्वसाधारण, प्रभाग २ अ - सर्वसाधारण महिला, २ ब- सर्वसाधारण, प्रभाग ३ अ - सर्वसाधारण महिला,  ३ ब - अजा सर्वसाधारण, प्रभाग ४ अ -सर्वसाधारण महिला, ४ ब - सर्वसाधारण, प्रभाग ५ अ -सर्वसाधारण महिला,  ५ ब - सर्वसाधारण, प्रभाग ६ अ - सर्वसाधारण महिला, ब - सर्वसाधारण. प्रभाग ७ अ - एस. सी. महिला, ७ ब - सर्वसाधारण, प्रभाग ८ अ - एससी महिला, ८ ब - सर्वसाधारण,  प्रभाग ९ अ- सर्वसाधारण महिला, ९ ब - सर्वसाधारण, प्रभाग १० अ - सर्वसाधारण महिला, १० ब -सर्वसाधारण, प्रभाग ११ अ - सर्वसाधारण महिला, ११ ब - सर्वसाधारण, प्रभाग १२ अ - एसटी महिला, १२ ब - सर्वसाधारण, प्रभाग १३ अ - सर्वसाधारण महिला,  १३ ब- सर्वसाधारण, प्रभाग १४ अ - एस सी महिला, १४ ब- सर्वसाधारण, प्रभाग १५ अ - एस सी महिला, १५ ब - सर्वसाधारण, प्रभाग १६ अ - सर्वसाधारण महिला, १६ ब - सर्वसाधारण, प्रभाग १७ अ - सर्वसाधारण महिला, १७ ब - सर्वसाधारण, प्रभाग १८ अ - सर्वसाधारण महिला, १८ ब - सर्वसाधारण, प्रभाग १९ अ - सर्वसाधारण महिला, १९ ब - एस सी सर्वसाधारण, प्रभाग २० अ- सर्वसाधारण महिला, २० ब - सर्वसाधारण महिला व २० क - सर्वसाधारणसाठी सोडण्यात आले आहे.

From around the web