गालिब नगर मधील अतिक्रमण काढून नैसर्गिक स्त्रोत अतिक्रमण मुक्त करा
उस्मानाबाद - उस्मानाबाद नगरपालिकेच्या हद्दीतील गांधीनगर येथे नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत असणाऱ्या ठिकाणी असलेले अतिक्रमण तात्काळ काढून टाकावे अशी मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रशांत (बापू) साळुंके यांनी मदत व पुनर्वसन मंत्री यांच्यासह अल्पसंख्यांक विकास मंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्यामार्फत देण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे की, गालीबनगर या ठिकाणी गेल्या ४० वर्षांपासून वास्तव्याला राहणाऱ्या नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात घरात पाणी शिरून कौटुंबिक संसारोपयोगी साहित्याचे नुकसान सहन करावे लागते आहे.
या भागातील नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत अतिक्रमण झाल्याने या भागातील रहिवाशांना मोठा पाऊस झाल्यानंतर आर्थिक त्रास सहन करावा लागतो तसेच साथीच्या रोगाचे प्रमाण देखील या ठिकाणी वाढते आहे. त्यामुळे उस्मानाबाद चे तहसीलदार यांनी या ठिकाणी तात्काळ भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेऊन तत्काळ अतिक्रमणमुक्त भाग करावा अशी मागणी केली आहे.
३० दिवसांमध्ये या भागातील अतिक्रमण मुक्त न केल्यास तहसीलदारांच्या दालनांमध्ये मा तहसीलदाराचे नाका तोंडात पाणी जाईपर्यंत टॅंकरद्वारे पाणी सोडण्याचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेला आहे.