आजी - माजी अधिकार्‍यांच्या हस्ते अष्टविनायक चौक येथे वृक्षारोपण

पहिल्या टप्प्यात कडुनिंबाच्या 750 रोपांची लागवड; दोन हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
 
s
 शिवसेनेचे उपशहरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत (बापू) साळुंके यांची माहिती

उस्मानाबाद - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त धाराशिव शहरातील अष्टविनायक चौक परिसरात राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत आनंदे यांच्यासह आजी-माजी अधिकार्‍यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  प्रभाग चारमध्ये 2000 वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून मंगळवारी पहिल्या टप्प्यात औषधी गुण असलेल्या कडुनिंबाच्या 750 रोपांची लागवड करण्यात आली आहे. यापुढे आणखी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपशहरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत (बापू) साळुंके यांनी दिली.

या कार्यक्रमात अष्टविनायक चौक परिसरात उपस्थित आजी-माजी अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत आनंदे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील, सुरेश शिंदे, बलभीम इंगळे, श्री. जाधव, निवृत्त कोषागार अधिकारी श्री.वाघमारे, अ‍ॅड.इंद्रजित शिंदे, न्यायालयातील सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक सुरते, महावितरणचे सेवानिवृत्त अभियंता माळी, मुक्तार डोंगरे, बिलाल शेख जमशेद पठाण,  जाकेर शेख, अजित बाकले, रोहन गव्हाणे, प्रशांत मते, गणेश पाटील, विकास जाधव, महेश चौगुले, रवि साबळे, श्री. गुंडरे, प्रकाश साळुंखे यांच्यासह प्रभाग क्रमांक चारमधील ज्येष्ठ नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 

From around the web