उस्मानाबादचा आठवडी बाजार भरतोय दुर्गंधीत !
भाजीपाला नव्हे तर रोगांच्या जिवाणूंची खरेदी
उस्मानाबाद - जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरात दर आठवड्याला आठवडी बाजार रविवारी शहराच्या मध्यवर्ती व गजबजलेल्या ठिकाणी बनविला जातो. मात्र या बाजारात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून या भागातून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण तुंबली आहे. तर नगरपरिषदेच्या दोन्ही गाड्यांमध्ये गटारी तुंबली असून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यातच खेड्यापाड्यातून आलेले शेतकरी आपला माल विक्री करण्यासाठी बसतात. त्यामुळे या भाजीपाल्यावर या घाणीचे विषाणू मोठ्या प्रमाणात साचत असल्याने नागरिक भाजीपाल्या बरोबर रोगराई विकत घेऊन जात असल्याचे दुर्दैवी परंतू तितकेच वास्तववादी चित्र या बाजारात निर्माण झाले आहे.
उस्मानाबाद शहरात दर रविवारी आठवडी बाजार आंबराईत असलेल्या परिसरात भरला जातो. या ठिकाणी व्यापारी, जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शेतकरी देखील आपले माळवे व इतर फळ भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात. या परिसरात शहरातून वाहणारा मोठा नाला असून या नाल्याच्या दुतर्फा भाजीपाला विक्रीसाठी शेतकरी व व्यापारी ठाण मांडून बसलेले असतात. हा नाला गेल्या कित्येक महिन्यांपासून घाणीने तुडुंब भरला आहे. तर नगर परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या शॉपिंग सेंटरमधील दोन्ही गाळ्यात असलेल्या रस्त्यावर देखील विक्री करण्यासाठी शेतकरी व व्यापारी बसलेले असतात. मात्र या ठिकाणी असलेल्या गटारी घाणीने तुडुंब भरले आहेत.
विशेष म्हणजे या परिसरात बसलेल्या शेतकरी व व्यापाऱ्यांकडून नगर परिषदेच्या वतीने घर वसुली मोठ्या जोमात व थाटात केले जाते. परंतु सुविधा देण्याच्या नावावर बोंबाबोंब असल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना नाईलाजास्तव तो कर गुपचूपपणे द्यावा लागत आहे. या परिसरातील दुर्गंधीमुळे विक्री करणाऱ्या सह बाजार करण्यासाठी आलेल्या बाजार करून ना-या दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील फळे व भाजीपाल्यावर या घाणीवरील विषाणू या मोठ्या प्रमाणात येऊन बसतात. आलेले बाजार करून नागरिक तो माल जीव घेण्या विषाणूंना घरी घेऊन जात आहेत. त्यामुळे एक प्रकारे नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा घातक प्रकार नगर परिषद प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असल्याचे समोर आले आहे.
सर्वत्र कोरोना विषाणूंची महामारी मोठ्या प्रमाणात सुरू असताना वर्षासन आवश्यक ती खबरदारी घेण्याबरोबरच रोगराई पसरवणारे ठिकाणी स्वच्छता करण्याची मोहीम राबवीत आहे. मात्र नगर परिषदेच्या माध्यमातून या परिसरात कुठल्याही प्रकारची स्वच्छतेची कामे केली जात नाहीत हे विशेषत्वाने व खेदाने नमूद करावेसे वाटते.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असून पावसाळ्यातील साथीच्या आजारापासून आवश्यक ती काळजी व उपाय योजना करण्याचे आरोग्य प्रशासन आवाहन करीत आहे. मात्र नगर परिषदेचे स्वच्छता व आरोग्य प्रशासन याकडे ढुंकूनही पाहत नसल्यामुळे या दुर्गंधीचा व पसरणाऱ्या आजाराने नागरिक नक्कीच ग्रास तील यामध्ये तिळमात्र शंका नाही.